British PM Rishi Sunak: 'हॅलो विजय मामा, मी ऋषी बोलतोय...', ब्रिटनच्या पंतप्रधानांचा Video Call व्हायरल!

Rishi Sunak Video Call To Vijay Mama : संजय रैना यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओमधून ऋषी सुनक विजय मामांना (Vijay Mama) आमंत्रण देताना दिसत आहे.

Updated: Oct 28, 2022, 09:20 PM IST
British PM Rishi Sunak: 'हॅलो विजय मामा, मी ऋषी बोलतोय...', ब्रिटनच्या पंतप्रधानांचा Video Call व्हायरल! title=
Rishi Sunak Video Call To Vijay Mama

Rishi Sunak Viral Video : ब्रिटनमध्ये लिझ ट्रस यांचं सरकार फक्त 45 दिवसांनी कोसळल्यानंतर ब्रिटनच्या (Uk New Prime Minister) राजकीय इतिहासात मोठा इतिहास घडला. भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान (Rishi Sunak) झाले आहेत. नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनुक हे प्रसिद्ध शेफ संजय रैना (Sanjay Raina) यांच्यासोबत एका व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यानंतर संजय रैना यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओमधून ऋषी सुनक विजय मामांना (Vijay Mama) आमंत्रण देताना दिसत आहे.

संजय रैना यांनी 15 सेकंदांचा मजेशीर व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये ऋषी सुनक आणि संजय रैना दिसत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून ऋषी सुनक यांनी विजय मामा यांना आपल्या घरी बोलवताना दिसत आहेत. त्यानंतर आता विजय मामा म्हणजे नक्की कोण?, असा सवाल आता सोशल मीडियावर उपस्थित होताना दिसतोय.

आणखी वाचा - शेम टू शेम... Rishi Sunak पंतप्रधान पण नेहरा होतोय ट्रेंड, नेटकऱ्यांना काहीही सुचतं!

Rishi Sunak व्हिडीओमध्ये काय म्हणाले?

हॅलो विजय मामा, मी ऋषी बोलतोय...तुम्ही कसे आहात?, अपेक्षा आहे की तुम्ही इथं याल आणि मला भेटाल. जेव्हा पण तुम्ही इथे याल तेव्हा संजयला डाऊनिंग स्ट्रीट येथं नेण्यास सांगा. माझं बोलणं लक्षात राहू द्या, असं ऋषी सुनक (Rishi Sunak Video Call) म्हणताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान, ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर आता जगभरात आनंदोत्सव साजरा केला जातोय. अनेकांनी ऋषी सुनक यांच्या शांत स्वभावाचं कौतूक केलंय. असं असलं तरी ऋषी सुनक यांच्यावर ब्रिटनची अर्थव्यवस्था पुन्हा उभारण्याची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे आगामी काळात ऋषी सुनक कोणता निर्णय घेतील? तो भारताच्या फायद्याचा असेल का?, असे सवाल आता अनेकजण विचारत असल्याचं दिसतंय.