18 वर्षाच्या मुलाने आई वडिलांसह आख्खं कुटुंबच संपवलं; समोर आलं धक्कादायक कारण

Crime News : पोलिसांना एका तरुणाने आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती मिळाली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता आरोपी मुलगा घरात जाण्याचा रस्ता अडवून बसला होता. घरात जाऊन पाहिलं तर सर्वांचे मृतदेह पडले होते. 

Updated: May 27, 2023, 04:03 PM IST
18 वर्षाच्या मुलाने आई वडिलांसह आख्खं कुटुंबच संपवलं; समोर आलं धक्कादायक कारण title=

Crime News : अमेरिकेत (US) गोळाबाराच्या घटनांमधून सामूहिक हत्यांचे सत्र सातत्याने सुरु असल्याचे पाहायला मिळते. मॉल, शाळा किंवा रस्त्यावर उघडपणे गोळीबार करत अनेकांची हत्या केली जाते. अशातच टेक्सासमध्ये एका 18 वर्षाच्या मुलाने त्याचे आख्ख कुटुंबच संपवलं आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये (texas) एका 18 वर्षीय मुलाला त्याच्याच कुटुंबातील सदस्यांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हत्येचे कारण ऐकून मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.

टेक्सासमध्ये 18 वर्षीय तरुणाने आपल्याच कुटुंबियांतील चार जणांची हत्या केली आहे. मृतांमध्ये तरुणाचे आई-वडील आणि मोठी बहीण आणि पाच वर्षांच्या भावाचा समावेश आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, सीझर ओलाल्डे असे या तरुणाचे नाव आहे. सीझर दावा आहे की त्याचे कुटुंबीय नरभक्षक होते आणि ते त्याला खाऊन टाकणार होते. त्यामुळे त्याने सगळ्यांची निर्घृणपणे हत्या केली.

पोलिसांनी माहिती मिळाली की एक तरुण आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता सीझरने स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. पोलिसांना घरामध्ये चौघांचे मृतदेह पडले असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी संशयित सीझरला अटक केली. सीझर त्यानंतर पोलिसांना सांगितले की, मीच माझ्या कुटुंबीयांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याचे आई वडिल रिबेन ओलाल्डे आणि आयडा गार्सिया, मोठी बहीण लिस्बेट ओलाल्डे आणि लहान भाऊ ऑलिव्हर ओलाल्डे यांचे मृतदेह बाथरूममधून बाहेर काढले.

सीझरची आई बराच वेळ कामावर न आल्याने तिचा एक सहकारी कारण विचारण्यासाठी ओलाल्डे कुटुंबियांच्या घरी पोहोचला होता. मात्र सीझर बंदूक दाखवून त्याला अडवले. त्यावेळी सीझरने सांगितले की, मी माझ्या कुटुंबाला नरभक्षक असल्याने मारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांवर घराच्या वेगवेगळ्या भागात गोळ्या झाडण्यात आल्याचे दिसून आले आहे. यानंतर त्यांना ओढत बाथरूममध्ये नेण्यात आले. याशिवाय घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोळ्या विखुरल्या होत्या. तसेच घरात रक्तच रक्त सांडले होते. दुसरीकडे शेजाऱ्यांच्य म्हणण्यानुसार ओलाल्डे कुटुंबिय चांगले होते. त्यांच्या मुलाने हे सर्व का केले याबद्दल मात्र काही माहिती नाही.

40 मगरींनी वृद्धाला संपवलं

एका मगरीला हटकण्यासाठी गेलेल्या एका वृद्ध व्यक्तींना मगरींच्या गटाने संपवल्याची घटना कंबोडियामध्ये घडली आहे. मगरीला पळवून लावण्यासाठी वृद्धाने काठीचा वापर केला होता. मात्र मगरीने ती काठी आपल्या तोंडात पकडून जोरात खेचली त्यामुळे वृद्ध व्यक्ती खाली पडली. त्यानंतर 40 मगरी त्या वृद्ध व्यक्तीवर तुटून पडल्या. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x