निष्काळजीपणा! ट्रम्प यांच्या रॅलीनंतर अमेरिकेत वाढले कोविड-१९ चे रुग्ण

निवडणुकीच्या प्रचारासाठी काढली होती रॅली 

Updated: Jul 10, 2020, 06:49 AM IST
निष्काळजीपणा! ट्रम्प यांच्या रॅलीनंतर अमेरिकेत वाढले कोविड-१९ चे रुग्ण

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याद्वारे महामारीत २० जून रोजी आपल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अमेरिकेतील रॅली काढण्यात आली. यानंतर तुलसा शहरात कोविड-१९ ची रुग्णसंख्या अचानक वाढली आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, ओक्लाहोमा राज्यातील दुसऱ्या मोठ्या शहरात दोन दिवसांत जवळपास ५०० नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. जो खूप मोठा आकडा आहे. 

तुलसा आरोग्य विभागाने बुधवारी नवीन २६६ रुग्णांची माहिती दिली. ज्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ही ४५७१ इतकी झाली आहे. तसेच जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, ओक्लाहोमा येथे १७,८९४ रुग्णांची नोंद झाली आहे तर यामधील ४५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

अचानक झालेल्या या रुग्णवाढीचं कारण विचारलं असता २० जून रोजी तुलसा येथे झालेली रॅली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यात येथे अनेक गोष्टींच आयोजन करण्यात आलं आहे. आता आपण फक्त रुग्णसंख्या एकत्र करू शकतो. 

ट्रम्प यांच्या अभियानाचे प्रमुख टिम मुटरे यांनी सांगितल्यानुसार, राष्ट्रपतींची रॅली १८ दिवस अगोदरच नियोजित होती. सर्व उपस्थितांच्या शरीरातील तापमान तपासण्यात आले होते. तसेच सर्वांना मास्क देण्यात आले होते. तसेच सगळ्यांना हँड सॅनिटाइजर उपलब्ध करून दिली होते. 

तुलसा अग्निशमन विभागानुसार, एका हॉलमध्ये आयोजित केलेल्या रॅलीत जवळपास ६,२०० नागरिक सहभागी होती. त्याच रॅलीत सर्वाधिक लोकांनी मास्क घालणं टाळलं होतं.