झोपेतून उठून Email वाचला अन् नशीबच उजळलं

ते म्हणतात की कधीकधी स्वप्ने सत्यातही येतात. एका व्यक्तीला एखाद्या लॉटरीचं तिकीट नाही तर पूर्ण 75 कोटी रुपये मिळाले आहेत. 

Updated: Jan 23, 2021, 08:12 PM IST
झोपेतून उठून Email वाचला अन् नशीबच उजळलं

ब्रिसबेन: कधी-कधी स्वप्नातही विचार केला नसेल किंवा पहाटे पाहिलेलं स्वप्न रातोरात पूर्ण होईल असं क्वचितच होतं. नशीबाचा खेळ कुणाला चुकला नाही. कोरोना लॉकडाऊन आणि यानंतर झालेल्या बदलातून सावरत असताना एका तरुणाचं रातोरात नशीब पालटलं. एका इ-मेलमुळे त्याचं नशीब उजळल्याची घटना समोर आली आहे. 

ते म्हणतात की कधीकधी स्वप्ने सत्यातही येतात. एका व्यक्तीला एखाद्या लॉटरीचं तिकीट नाही तर पूर्ण 75 कोटी रुपये मिळाले आहेत. 30 वर्षीय व्यक्तीने झोपेतून उठल्यानंतर त्याचा फोन चेक केला. त्यावर खूप इमेल आले होते. त्यातला मेल वाचून तर त्याची झोपच उडाली. 

पावरबॉल लॉटरीमधून त्याला एक मेल आला होता. काही हजार किंवा लाख नाही तर तब्बल 75 कोटींची लॉटरी लागल्याचा हा इ-मेल होता. हा माणूस म्हणतो की मेल पाहिल्यानंतर माझी झोपच उडाली अशी प्रतिक्रिया या व्यक्तीनं दिली आहे. लॉटरी लागल्याचं समजल्यानंतर तर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन शहरात ही घटना समोर आली आहे. 

या 75 कोटी रुपयांमधून हा तरुण आपल्या आईसाठी खास घर खरेदी करणार आहे. पैसे हातात आल्यानंतर या व्यक्तीनं त्याचा प्लॅन असल्याचं त्यानं सांगितलं. पॉवरबॉलच्या 21 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या लॉटरीच्या निकालात या व्यक्तीला 75 कोटी रुपयांची लॉटरी लागली.

इतकेच नव्हे तर त्याला बरीच छोटी बक्षिसेही मिळाली ज्यातून त्यांच्या खात्यात 10,367,144 डॉलर्स जमा झाले आहेत. त्याने सांगितले की तो रात्री लवकर झोपला, परंतु रात्री दोन वाजता त्याला जाग आली. त्यानं आपला मोबाईल तपासला. त्यावर खूप मेल आले होते. त्यावेळी ई मेल चेक करताना त्याची झोपच उडाली. पावरबॉल कंपनीकडून हा मेल आला होता. या व्यक्तीनं लॉटरी जिंकली होती. 

मी कधीकधी पावरबॉल खेळतो असंही या व्यक्तीनं सांगितलं आहे. ही लॉटरी लागली असली तरी मी माझी नोकरी सोडणार नाही. मी नोकरी सोडली तर कंटाळा येईल असंही तो म्हणाला. त्यातून एका छान आईसाठी घर खरेदी करणार असल्याचं सांगितलं आहे. लॉटरी विजेता म्हणतो की त्याच्याकडे खूप काम करायचे आहे परंतु याक्षणी तो इतका उत्साहित आहे की त्याला काहीही निर्णय घेता येत नाही. हे सर्व त्याच्यासाठी स्वप्नासारखे आहे.