Viral News : मुंबईतील लालबाग परिसरात (Mumbai Lalbaug Murder) पोटच्या पोरीने आईची निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे ती आईच्या मृतदेहासोबत एकाच घरात तब्बल तीन महिने होती. या सुन्न करणाऱ्या घटनेनंतर अजून अस्वस्थ करणाऱ्या घरी समोर आली आहे. एक व्यक्ती त्याचा आईच्या मृतदेहासोबत एक नाही दोन नाही वर्ष पण नाही, तब्बल 6 वर्षे एकाच घरात राहिला.
आई वडिलांचं जान हे मुलांसाठी खूप वेदनादायक आणि असह्य असतं. आपल्या प्रिय व्यक्तीचा जेव्हा अकस्मात मृत्यू होते हा धक्का त्या व्यक्तीला पोकळ करतो. मग ती व्यक्ती शॉकमध्ये असं काही करते की तुमचा विश्वास बसणार नाही. आपण अनेक चित्रपटात पाहिलं आहे. आई किंवा वडिलांचा निधनानंतर मुलगा त्यांचा मृतदेह घरातच अनेक वर्ष ठेवतो.पण या मुलाने कुठल्या शॉक किंवा प्रेमापोटी हा मृतदेह घरात ठेवला नव्हता. या घटनेमागील कारण जाणून तुम्हाला विश्वासच बसणार नाही.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मृत महिलेचे नाव हेल्हा मारिया हेंगबार्थ असं होतं. तिच्या मृत्यूनंतरही तिच्या मुलाने तिच्यावर अंत्यसंस्कार केले नाही. तर 6 वर्षे मृतदेह घरातच ठेवले होते. आजूबाजूचे शेजारी त्या मुलाला आईबद्दल विचार होते. तेव्हा आई जर्मनीला गेली आहे असं सांगायचा. त्याने असं करण्यामागे कारण होतं आईची पेन्शन...या 6 वर्षांत त्या मुलाने आईला जिंवत दाखवून 1 कोटी 59 लाख रुपयांहून अधिक पेन्शन घेतली होती. (viral news son lived with mothers mummified corpse 6 years At home for mothers pension trending news in Social media)
मुलाचा हा कारनामा त्याचा आईच्या हेल्थ कार्डवरुन उघडकीस आला. कारण तब्बल 6 वर्ष हेल्गाने हेल्थ कार्डवर काहीही दावा केला नव्हता. त्यामुळे इटालियन अधिकाऱ्यांना संशय आला. त्यावेळी पोलिसांनी मुलाच्या घरावर छापा मारला. पण तेव्हा मुलगा घरी नव्हता. पोलिसांनी बेडरुममध्ये एका बेडवर मृतदेह गुंडाळलेला दिला. पोलिसांनी तो शवविच्छेदनाला पाठला आणि ही घटना समोर आली. तो मृतदेह हेल्गा हिचा होता. त्याशिवाय तिचा मृत्यू सहा वर्षांपूर्वीच झाला होता. पोलिसांनी तपास केल्यावर कळलं तिच्या 60 वर्षांच्या मुलगा तिला जिंवत ठेवून पेन्शन घेत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.