कानात खाज येते म्हणून डॉक्टरकडे गेली महिला, कॅमेऱ्यानं तपासलं तर डॉक्टरला बसला धक्का

कानात खाज येत म्हणून डॉक्टरकडे गेली महिला, कानात कॅमेरा घालताच डॉक्टरला जे दिसलं ते पाहून झाला  हैराण

Updated: Oct 22, 2021, 05:51 PM IST
कानात खाज येते म्हणून डॉक्टरकडे गेली महिला, कॅमेऱ्यानं तपासलं तर डॉक्टरला बसला धक्का

नवी दिल्ली: कानात बऱ्याचदा खाज येत असते. कधी मळ साठला म्हणून तर कधी पाणी गेलं म्हणून. मात्र एका महिलेच्या कानात खूप जास्त खाज येऊ लागली. काहीच सुचत नसल्याने यावर उपाय करण्यासाठी ती तातडीनं डॉक्टरकडे पोहोचली. या महिलेच्या कानात नेमकी खाज कशामुळे येते हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी कानात कॅमेरा सोडला. त्यांनी जे पाहिलं त्यानंतर डॉक्टरलाही मोठा धक्का बसला. 

महिलेच्या कानात घातलेल्या कॅमेऱ्यातून जे दिसलं ते फार धक्कादायक होतं.एक कोळी त्या महिलेच्या कानात आरामात राहत होता. त्याने महिलेच्या कानात आपलं घर तयार करायला सुरुवात केली होती. कोळी अजिबात लहान नव्हता. त्याचे 8 पाय कानाच्या आतल्या बाजूला होते. कॅमेऱ्याच्या लेन्समुळे हा कोळी त्याच्या आकारपेक्षा जास्त मोठा देखील दिसत होता. 

या महिलेनं केलेल्या दाव्यानुसार ती बाहेर गेली होती. त्यानंतर महिलेच्या कानात खूप जास्त खाज यायाला सुरुवात झाली होती. बाहेरून आल्यानंतर खाज सुरू झाली आणि नंतर वाढतच गेली. तिलं वाटलं की कानात इन्फेक्शन आहे.

डॉक्टरांनी खाज सुटण्याच्या अशा कारणाचा अंदाजही लावला नव्हता, पण कॅमेऱ्यातून कोळी पाहिल्यानंतर त्यांनी लगेच ते काढण्याची तयारी सुरू केली. डॉक्टरांनी इलेक्ट्रिक ओटोस्कोपद्वारे कानातून कोळी काढला. मग कुठे त्या महिलेला आराम मिळाला. मेट्रो यूकेच्या अहवालानुसार, ही घटना चीनच्या हुनान प्रांतातील झुझोऊ शहरातील असल्याची माहिती मिळाली आहे.