विमान ढगांमधून जाताना कसा नजारा दिसतो? पाहा वैमानिकाने कॉकपिटमधून शूट केलेला VIDEO

वैमानिकाने कॉकपिटमधून शूट केलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 29, 2023, 03:53 PM IST
विमान ढगांमधून जाताना कसा नजारा दिसतो? पाहा वैमानिकाने कॉकपिटमधून शूट केलेला VIDEO title=

विमानातून प्रवास करताना खिडकीच्या शेजारची सीट मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. याचं कारण खिडकीतून दिसणारं मनमोहक दृश्य पाहण्याचा मोह आवरत नसतो. आपण कितीही मोठे झालो तरी ही एक गोष्ट मात्र आपल्याला बालपणात घेऊन जाते. अनेकदा आपल्याला हे दृश्य पाहिल्यानंतर कॉकपिटमधून किती सुंदर दिसत असेल असंही वाटतं. पण प्रवाशांना तिथे प्रवेश निषिद्ध असल्याने आपण फक्त अंदाजच लावू शकतो. दरम्यान सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. 

Newsweek त्या वृत्तानुसार हा व्हिडीओ टर्कीमधला आहे. वैमानिक Bedrettin Sagdic याने हा व्हिडीओ मूळत: आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे. या व्हिडीओ करोडो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओत विमान इंस्ताबूल विमानतळावर लँडिग करताना दिसत आहे. दरम्यान विमान लँड होण्याआधी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. Sagdic हे 16 वर्ष हवाई वाहतूक विभागात होते. यानंतर ते वैमानिक झाले. 

व्हिडीओच्या सुरुवातीला आकाशात ढगांची सुंदर चादर पसरलेली दिसत आहे. रात्रीच्या वेळी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. विमान ढगांमधून मार्ग काढत लँडिग होण्यासाठी खालील बाजूला दिसत आहे. 

ढगांमधून खाली उतरल्यानंतर विमान डाव्या बाजूला वळण घेताच खाली शहर दिसत आहे. यानंतर विमान जेव्हा लँडिंगसाठी जातं, ते पाहताना काळजाचा ठोका चुकतो. 

एक्सवर ही पोस्ट शेअर करण्यात आली असून, 'रात्री लँडिंग करताना कॉकपिटमधील पायलट व्ह्यू' अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण भारावून जात आहे. 

एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे की, 'अंगावर रोमांच उभे करणारी 32 सेकंद'. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, ढगांमधूनही तुम्ही कसं काय पाहू शकता हे आश्चर्य आहे.