ही कंपनी ४८ लाख कार परत मागवणार

 फॉक्सवॅगन एजी व त्यांची चीनची सहायक कंपनी एफएडब्ल्यू- फॉक्सवॅगन चीनमधून ४८ लाख कार परत मागवणार आहे. या कारमध्ये सदोष एअरबॅग्जस असल्याने कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Updated: Sep 14, 2017, 05:38 PM IST
ही कंपनी ४८ लाख कार परत मागवणार  title=

चीन : फॉक्सवॅगन एजी व त्यांची चीनची सहायक कंपनी एफएडब्ल्यू- फॉक्सवॅगन चीनमधून ४८ लाख कार परत मागवणार आहे. या कारमध्ये सदोष एअरबॅग्जस असल्याने कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

एअरबॅग बनवणारी कंपनी टकाटा कॉर्पोरेशन दिवाळखोरीत निघाली आहे. जर्मनीची कंपनी जनरल मोटर्स आणि मर्सिडीज कंपनीला त्यांनी ज्या कारसाठी टकाटा कंपनीच्या एअरबॅग्ज वापरल्या आहेत, त्या परत मागवण्याचाआदेश दिला होता. या संस्थेच्या मते, चीनमध्ये सुमारे २९ लाख कारमध्ये टकाटा एअरबॅग्जचा वापरण्यात आल्या आहेत. या एअरबॅग्जमुळे आतापर्यंत सुमारे १६ लोकांचा मृत्यू तर १८० जण जखमी झाले आहेत.

 चीनच्या जनरल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ क्वॉलिटी सुपरव्हिजन, इन्स्पेक्शन अँड क्वारेंटाइनच्या अहवालानुसार फॉक्सवॅगन चीनमधील एकूण १,०३,५७३ कार, एफएडब्ल्यू- फॉक्सवॅगन २३.५ लाख कार आणि एसएआयसी- फॉक्सवॅगन एकूण २४ लाख कार परत मागवणार आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या वर्षी मार्च महिन्यात गाड्या परत मागवण्याची प्रक्रिया सुरू करतील. २०१९ पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. दरम्यान, सुमारे ३७ कंपन्या टकाटा एअरबॅग्जचा वापरतात.