रशियात मोठी विमान दुर्घटना; पुतिन यांचे विरोधक असलेल्या वॅग्नर प्रमुख प्रिगोझिनचा मृत्यू?

मॉस्कोजवळ पीटसबर्गमध्ये खासगी विमान कोसळलं. विमान दुर्घटनेत 10 जण ठार झाले. 

Updated: Aug 23, 2023, 11:55 PM IST
रशियात मोठी विमान दुर्घटना; पुतिन यांचे विरोधक असलेल्या वॅग्नर प्रमुख प्रिगोझिनचा मृत्यू? title=

Wagner chief Yevgeny Prigozhin : रशियात मोठी विमान दुर्घटना घडली आहे (plane crash in Russia). या दुर्घटनेत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक असलेल्या वॅग्नर प्रमुख प्रिगोझिनचा (Yevgeny Prigozhin) मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विमान दुर्घटनेत 10 जण ठार झाले असून मृतांमध्ये प्रिगोझिनचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  

रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोजवळील पीटसबर्ग जवळ ही दुर्घटना घडली. दुर्घटनाग्रस्त विमान हे एक खाजगी विमान होते. रशियन वृत्तसंस्थांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. बचाव पथक घटनास्थळी झाले आहे. तसेप तपास यंत्रणा देखील याचा तपास करत आहेत. विमानात तीन वैमानिकांसह एकूण सात प्रवासी होते. विमानाचा अपघात नेमका का झाला याचा शोध घेण्यात येत आहे.     मीडिया रिपोर्ट्समध्ये हे विमान प्रिगोझिनचे असल्याची चर्चा आहे. 

कोण आहे वॅग्नर प्रमुख प्रिगोझिन?

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात उठावाचे नेतृत्व केल्यामुळे प्रिगोझिन चर्चेत आला. वॅगनर ग्रुप हे एक खाजगी सैन्य आहे. वॅगनर आर्मी युक्रेनमध्ये रशियन सैन्यासोबत युद्ध लढत होती. मागील अनेक वर्षांपासून  प्रिगोझिन  लष्करी आणि गुप्तचर कारवायांमुळे वादात सापडला होता. प्रिगोझिन हे एकेकाळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सर्वात जवळचा व्यक्तू होता. 
मात्र, काही महिन्यांत प्रीगोझिनने रशियन सैन्य आणि पुतीन यांच्याविरुद्ध बंडाच्या हत्यार उपसले आहे.