कामं सोडून रिकामी कामं करायला गेला आणि घरात चोर फसला, घर मालकाने टॉवेलवर पकडला

या चोरट्याने नेमकं असं का केलं, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.  

Updated: Jun 16, 2021, 09:46 PM IST
कामं सोडून रिकामी कामं करायला गेला आणि घरात चोर फसला, घर मालकाने टॉवेलवर पकडला

मुंबई :  सध्या चोरही हुशार झालेत. चोर आधीसारखे बंदूकीच्या जोरावर लूटमार करत नाहीत. चोरी करण्यासाठी चोरटेही नवनवीन आणि हायटेक आयडिया वापरतात. पण सर्वच यशस्वी होतात, अशातला भाग नाही. (Went to steal went and started bathing in the bathroom the owner caught it in the towel)

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील कॅलिफोर्नियात असा प्रकार घडला, ज्यामुळे तुम्हाला हसू आवरणार नाही. चोरीच्या उद्देशाने चोर दाम्पत्याच्या घरात शिरला. चोर चोरी करण्याऐवजी अंघोळ करत बसला. 

एका वृत्तवाहिनीच्या वेबसाईटनुसार, ही घटना 3 जूनची आहे. स्टीव बाऊरच्या पत्नीला घरात रात्री 11 च्या दरम्यान नळ सुरु असल्याची चाहूल लागली. त्यावेळेस तिला बाथरुमचा दरवाज्याचा आरसा तुटलेला दिसला. 

काहीतरी अपप्रकार घडत असल्याचं लक्षात आलं. स्टीवने वैयक्तिक बंदूक काढली.  हा आवाज नक्की कोठून येतोय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा या दाम्पत्यानी पाहिलं तेव्हा हा चोरटा चक्क टॉवेल घालून अंघोळ करत होता.  

सीएनएनुसार, या चोरट्याच नाव Carrola Tiago Freitas असं आहे. या चोरट्याने मातीच्या ससाच्याआधारे घराचा आरसा तोडून आत शिरला होता.  

स्टीवने दिलेल्या माहितीनुसार, "मी जसं त्या चोराला पाहिलं, तसं त्यावर मी बंदूर रोखून धरली. ज्यामुळे तो पळून जाऊ शकणार नाही. पण त्या बंदूकीत गोळी नव्हती", असं स्टीव्हने स्पष्ट केलं. स्टीवने सर्व प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर  Carrola ला ताब्यात घेतलं.   

संबंधित बातम्या : 

पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना म्हटलं गाढव... संसदेत अराजकता

अंटार्क्टिकामधील हिमनग पूर्ण विरघळतील आणि जगबुडी येईल, वैज्ञानिकांची भीतीदायक भविष्यवाणी