संमतीने शारीरिक संबंध ठेवले, पण तरुणीच्या तक्रारीनंतर मुलाला 4 वर्षांची शिक्षा... काय घडलं नेमकं

What is Stealthing : एका तरुणाने तरुणीबरोबर परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवले. पण यानंतरही तरुणीने तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तरुणाला दोषी मानत चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.  

Updated: Jun 14, 2024, 07:49 PM IST
संमतीने शारीरिक संबंध ठेवले, पण तरुणीच्या तक्रारीनंतर मुलाला 4 वर्षांची शिक्षा... काय घडलं नेमकं title=

What is Stealthing : बलात्काराप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. गर्लफ्रेंडबरोबर शारीरिक संबंध ठेवताना तरुणाने कंडोमचा वापर केला नाही असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. कंडोमशिवाय शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत असं या दोघांमध्ये ठरलं होतं. याप्रकरणी तरुणीने कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने तरुणाला दोषी ठरवत चार वर्ष आणि तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. पण अशी शिक्षा का सुनावण्यात आली याबाबत चर्चा आहे. वास्तविक हा प्रकार स्टेल्थिंगचा (Stealthing) आहे. 

स्टेल्थिंग म्हणजे काय?
दोन व्यक्ती जेव्हा प्रोटेक्शनच्या आधारावर शारीरिक संबंध ठेवण्यास तयार होतात, पण यातील एक व्यक्ती कंडोमच्या वापराबद्दल आपल्या जोडीदाराशी खोटे बोलत असेल किंवा तिच्या परवानगीशिवाय कंडोम (Condoms) काढून टाकत असेल तर ते स्टेल्थिंग मानलं जातंते. हा बलात्कार ठरवण्यात येतो.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार ब्रिटेनच्या ब्रिक्स्टनमध्ये 39 वर्षांच्या गाई मुकेंदी या तरुणाने एका तरुणीबरोबर शारीरिक संबंध ठेवले. पण तिच्या परवानगीशिवाय त्याने कंडोम काढून टाकला. गॅन मुकेंदी आणि त्या तरुणीमध्ये प्रोटेक्शच्या आधारावरच शारीरिक संबंध प्रस्तापित करण्याची सहमती झाली होती.

आपली फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपी गॅन मुकेंदीने तरुणीची स्टेल्थिंगप्रकरणी माफी मागितली. पण दोघांमध्ये झालेल्या चॅटच्या आधारे गॅन मुकेंदीला दोषी ठरवण्यात आलं. काही चॅट आरोपीने मोबाईलमधून नष्ट केले होते. 

सुरुवातीला आरोपी गॅन मुकेंदीने आपण असा कोणताही प्रकार केला नसल्याचं उत्तर दिलं. पण महिलेची तक्रार आणि दोघांमध्ये झालेले चॅट पाहाता पोलिसांनी आरोपीला दोषी ठरवलं. पीडित तरुणीला न्याय देण्यासाठी आणि लोकांमध्ये शारीरिक संबंधांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी तरुणाला शिक्षा देणं गरजेचं होतं, असं पोलिसांनी सांगितलं.