...आणि चक्क दोन चाकांवर धावला ट्रक

आपल्या आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 17, 2017, 05:58 PM IST
...आणि चक्क दोन चाकांवर धावला ट्रक  title=
Photo From-gfycat.com

नवी दिल्ली : आपल्या आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

आपल्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकजण हा गाडीने प्रवास करत असतो. प्रत्येकालाच वेळेवर नियोजित ठिकाणी पोहोचायचं असतं त्यामुळे अनेकजण अतिघाई करतात आणि कधी-कधी अपघातही होतात.

सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक भरधाव ट्रक चक्क दोन चाकांवर चालताना दिसत आहे.

झालं असं की, क्रोएशियामध्ये एक ट्रक भरधाव वेगाने रस्त्यावरुन जात होता. त्याच दरम्यान तो ट्रक अचानक दोन चाकांवर चालू लागला. ड्रायव्हरने गाडी नियंत्रित करण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र, त्याला तात्काळ यश आलं नाही.

ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी जोरदार वारे वाहू लागले. या वाऱ्यांचा वेग तब्बल १०० किमी प्रति सात असा होता. जोरदार वाऱ्यांमुळे ट्रक एका बाजूला झेपला गेला आणि तो दोन चाकांवर चालू लागला. 

त्यानंतर काही वेळाने ट्रक पुन्हा आपल्या सामान्य स्थितीत आला. पण, ट्रक चालकाने यावेळी खूपच धैर्याने काम केलं आणि त्यामुळे ट्रकचा अपघात झाला नाही.