Trending News In Marathi: 8 मार्च 2020मध्ये महिलेने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. वयाच्या 39व्या वर्षी मौली ब्रोडक हिने जगाचा निरोप घेतला. मौली अमेरिकेतील अटलांटा येथे राहत होती तर लेखक व विद्यापीठात शिक्षिका होती. नेहमी आनंदी असणाऱ्या मौलीने अचानक इतका टोकाचा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला. मौलीचा पतीदेखील तिच्या मृत्यूने खचला होता. तिच्या कुटुंबीयातील लोकही तिने हा निर्णय का घेतला हे समजू शकले नाहीत. मात्र, मौलीच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने फोन तपासताच तिचे काळे सत्य समोर आले आणि तिच्या मृत्यूचे कारणदेखील.
न्यूयॉर्क पोस्टच्या मते, मौलीचे पती ब्लेक बटलर यांनी म्हटलं आहे की, मौली डिप्रेशनमध्ये होती. मात्र, तिला इतका टोकाचा निर्णय घेऊ शकेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. मौलीच्या मृत्यूनंतर मी तिच्यावर पुस्तक लिहण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर मला कळलं की तिच्याबद्दलच्या अनेक गोष्टी मला अद्याप ठावून नाहीयेत. मौली खूपच चांगली कवयित्री होती. तिची आणि माझी ओळख फेसबुकवर झाल, असं ब्लेक याने सांगितलं.
ब्लेक मौलीबद्दल सांगताना पुढे म्हणतोय की, मौलीचे बालपण खूप खडतर होते. वयाच्या 12व्या वर्षापासून तिला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा तीचे लग्न झाले होते पण ती त्यात खुश नव्हती. त्यानंतर 2017 मध्ये आम्ही दोघांनी लग्न केले. आमचं आयुष्य खूप चांगलं सुरू होतं. मात्र मौलीच्या अचानक मृत्यूमुळं सगळं उद्ध्वस्त झालं. तिच्या मृत्यूनंतर मी तिचा फोन तपासला तेव्हा माझ्या पायाखालची जमिनच हादरली, असं ब्लेक याने म्हटलं आहे.
ब्लेक बटलर याने म्हटलं की त्याची पत्नी मौली एक सिक्रेट आयुष्य जगत होती. ब्लेकने मौलीचा फोन चेक केला. तेव्हा त्याला कळलं की, लग्नानंतरच्या काही आठवड्यातच ती तिच्याच एका विद्यार्थ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आली. तिचे अनेक पुरुषांसोबत संबंध होते. फोनमध्ये अश्लील टॉयजसोबतचे आक्षेपार्ह फोटो होते. काही अश्लील कृत्ये करतानाचे व्हिडिओदेखील ब्लेकला सापडले होते. त्यानंतर ब्लेकने तिचा ईमेल तपासला तेव्हा मौलीने कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांना अश्लील फोटो पाठवले होते.
मौलीने एका व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवले होते. त्याचबरोबर त्याला अनेकदा पैसेदेखील पाठवले होते. मौलीचे काळे सत्य समोर आल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला आहे. मौली एका मानसिक आजाराशी लढत होती. त्यातच आपल्या भावनांवर नियंत्रण न ठेवता आल्यामुळं ती डिप्रेशनमध्ये गेली आणि त्यातुनच तिने आत्महत्या केली.
दरम्यान, मौलीच्या मृत्यूनंतर आणि तिचे सत्य समोर आल्यानंतर काही वर्षांनी ब्लेकने पुन्हा एकदा लग्न केले आहे. तसंच, मौलीच्या मृत्यूला आपण जबाबदार नसल्याची सल आता त्याला जाणवत नाही.