भारताचा आणखी एक शत्रू ठार; CRPF वरील हल्ल्याच्या मास्टरमाइंडची पाकिस्तानात हत्या

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनान याला ठार करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये 2015 मध्ये बीएसएफ जवानांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता.   

शिवराज यादव | Updated: Dec 6, 2023, 12:21 PM IST
भारताचा आणखी एक शत्रू ठार; CRPF वरील हल्ल्याच्या मास्टरमाइंडची पाकिस्तानात हत्या title=

पाकिस्तानातील भारताचा आणखी एक शत्रू ठार झाला आहे. कराचीमध्ये मोस्ट वाँटेड असणारा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनान याला ठार करण्यात आलं आहे. हंजलाने 2016 मध्ये पम्पोर येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले होते, तर 22 जण जखमी झाले होते. इतकंच नाही तर त्याने 2015 मध्ये जम्मूमधील उधमपूर येथे बीएसफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले होते, तर 13 जवान जखमी झाले होते. 

NIA ने या हल्ल्याचा तपास केला होता. 6 ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी चार्जशीट दाखल केली होती. या दोन्ही हल्ल्यांमध्ये हंजला पाकिस्तानात बसून दहशतवाद्यांना आदेश देत होता. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर आणि पुलवामा येथे आत्मघाती हल्ले घडवण्यात हंजलाचा हात होता. पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या लष्कर कॅम्पमध्ये भरती झालेल्या नव्या दहशतवाद्यांची दिशाभूल करण्यासाठी हंजलाला पाठवलं जात असे. खासकरुन त्या दहशतवाद्यांशी त्याची भेट घडवली जात असे जे भारतात घुसखोरी करुन दहशतवादी हल्ला करणार होते. अदनानला लष्कर कम्युनिकेशन तज्ज्ञही म्हटलं जात असे. 

 

जलाचा मृत्यू लष्कर-ए-प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. अदनान अहमद उर्फ हंजला अदनान लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिदचा निकटवर्तीय असलल्याचं बोललं जातं. 

2-3 डिसेंबरच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी 4 गोळ्या झाडून हंजलाला ठार केलं आहे. कडक सुरक्षा असतानाही हल्लेखोरांनी त्याची हत्या केली. सूत्रांच्या माहितीनुसार, हंजलाला त्याच्या सुरक्षित ठिकाणाच्या बाहेरच गोळ्या घालण्यात आल्या. गोळी लागल्यानंतर त्याला पाकिस्तानी लष्कराच्या कराचीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 5 डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला. हाफिजसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. हंजलाने नुकतंच आपला ऑपरेशन बेस रावलपिंडी येथून कराचीमध्ये हलवलं होतं.