मगर आणि अ‍ॅनाकोंडाच्या लढतीत कोण जिंकले? पाहा व्हायरल Video

मगर आणि अ‍ॅनाकोंडा यांची शिकार करण्याची पद्धत लक्ष वेधून घेते. हे दोन्ही प्राणी आपलं सावज एका झटक्यात हेरून चित करतात. मात्र हे दोन प्राणी एकमेकांच्या जीवावर उठले तर काय होईल? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

Updated: Jul 18, 2022, 02:24 PM IST
मगर आणि अ‍ॅनाकोंडाच्या लढतीत कोण जिंकले? पाहा व्हायरल Video title=

Viral Video: वन्यप्राण्यांच्या जीवनशैलीबद्दल लोकांना कायम उत्सुकता असते. वन्यप्राणी राहतात कसे? त्यांची शिकार करण्याची पद्धत, याबाबत कुतुहूल असतं. मगर आणि अ‍ॅनाकोंडा यांची शिकार करण्याची पद्धत लक्ष वेधून घेते. हे दोन्ही प्राणी आपलं सावज एका झटक्यात हेरून चित करतात. मात्र हे दोन प्राणी एकमेकांच्या जीवावर उठले तर काय होईल? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक विशाल अ‍ॅनाकोंडाने मगराला पकडले आहे. हा व्हिडीओ ब्राझीलचा आहे. दोघांमध्ये जीवन मरणासोबत वर्चस्वाची लढाई सुरू असल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मगर स्वत:ला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर अ‍ॅनाकोंडाने त्याला पूर्णपणे पकडले आहे. दोघांमधील ही लढत गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातील असून व्हिडीओ आता समोर आला आहे. अमेरिकेतील इंडियाना येथील रहिवासी असलेल्या किम सुलिवानने ही लढत कॅमेऱ्यात चित्रित केली आहे. हा व्हिडीओ आफ्रिकन वाइल्डलाइफ 1 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'हा अजगर नाही, तो ब्राझिलियन अजगरही नाही, हा आहे अ‍ॅनाकोंडा.' 550 पौंड वजनाचा अ‍ॅनाकोंडा आणि मगर यांच्यात झालेल्या या  लढाईत कोणाचा बाजी मारली याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. एका यूजरने लिहिले की, लढाईत कोण हरले? दुसऱ्या युजरने सांगितले की, शेवटी दोघेही थकले असतील. अ‍ॅनाकोंडाने आपली पकड काढून सोडली असावी, तर मगर इतका थकला असावा की तो अ‍ॅनाकोंडाला काहीही करू शकला नसावा. हा व्हिडीओ शनिवारी इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत 2 लाख 50 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 6800 लाईक्स मिळाले आहेत.