गर्लफ्रेंडला ठोकल्या बेड्या, त्यानंतर गाडीच्या छतावर बांधून शहरभर फिरले, व्हिडिओ व्हायरल

 एका जोडप्याची (Couple) विचित्र ट्रस्ट टेस्ट (Trust Test) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

Updated: Aug 5, 2021, 07:54 AM IST
गर्लफ्रेंडला ठोकल्या बेड्या, त्यानंतर गाडीच्या छतावर बांधून शहरभर फिरले, व्हिडिओ व्हायरल title=

मॉस्को : रशियातील (Russia) एका जोडप्याची (Couple) विचित्र ट्रस्ट टेस्ट (Trust Test) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा एकमेकांवर किती विश्वास आहे हे दाखवण्यासाठी, जोडप्याने चालत्या वाहनावर स्टंट केला. या स्टंटअंतर्गत प्रियकराने (Boyfriend) आपल्या मैत्रिणीला (Girlfriend) गाडीच्या  बेड्या ठोकत छतावर बांधून संपूर्ण शहरात फिरवले. या दरम्यान, त्याचा एक हात मैत्रिणीच्या हाताला हातकडीने बांधलेला देखील होता. दरम्यान, ही वेगळी बाब आहे की, ट्रस्टची चाचणी करण्याचा हा विचित्र मार्ग अनेक लोकांना आवडलेला नाही.

स्वतः शेअर केला व्हिडिओ

रशियन रहिवासी सर्गेई कोसेन्को (Sergey Kosenko) हा सोशल मीडिया सक्रीय असतो. त्यानेच या विचित्र ट्रस्ट टेस्टचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती एका मुलीला चालत्या कारच्या छतावर बांधताना दिसत आहे. गाडी लोकांच्यामधून जाताना प्रत्येकजण त्याकडे बघत राहतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर बहुतांश लोकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, विश्वास व्यक्त करण्याची ही पद्धत घातक ठरू शकते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sergey Kosenko (@sergey_kosenko)

यापूर्वी असे स्टंट केलेत

व्हिडिओमध्ये सेर्गेई आपल्या मैत्रिणीला कारच्या छतावर बांधून मॉस्कोच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. या दरम्यान, सेर्गेईचा एक हात त्याच्या मैत्रिणीच्या हाताला हातकडीने बांधलेला आहे. मुलीला छतावर दोरी आणि टेपने बांधण्यात आले होते, जेणेकरून ती पडण्याची शक्यता नव्हती. सेर्गेई स्वतः कार चालवत होता. रशियन सोशल मीडिया सक्रीय असणाऱ्या आणि त्याच्या मैत्रिणीने या प्रकारची विश्वास चाचणी आधीच केली आहे.

पोलिसांकडून ठोठावला मोठा दंड 

लोक सोशल मीडियावर प्रभावी करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, त्यावर कधी कौतुक होते तर कधी तीव्र टीका देखील होते. दरम्यान, या व्हिडिओवर जोरदार टीका होत आहे. त्याचवेळी, स्थानिक माध्यमांच्या मते, पोलिसांनी सर्गेई कोसेन्कोला मोठा दंड ठोठावला आहे. तसेच, सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपासही करत आहेत. दुसरीकडे लोकांचा राग पाहून सर्गेईने आपल्या स्टंटबद्दल माफी मागितली आहे.