ते दोरीला लटकून 32 व्या मजल्यावर काम करत होते, ती हळूच आली आणि कापल्या दोऱ्या... पुढे जे घडलं...

उंचावर काम करताना कुणाची दोरीचं कापली तर नक्कीच मोठा अपघात होईल. 

Updated: Oct 3, 2022, 07:29 PM IST
ते दोरीला लटकून 32 व्या मजल्यावर काम करत होते, ती हळूच आली आणि कापल्या दोऱ्या... पुढे जे घडलं... title=

World News : मुंबई, बंगळुरू, चेन्नई, नवी दिल्ली दिल्ली या मोठ्या शहरांमध्ये उंच इमारतींमध्ये अनेक लोकं राहतात, काम देखील करतात. या उंच इमारतीमध्ये काम करताना किंवा राहताना आपल्याला खिडकीतून अनेकदा काही कामगार सफाई, डागडुजी, किंवा पेंटिंग करताना पाहायला मिळतात. या कर्मचाऱ्यांना पाहून आपल्याच काळजाचा ठोका चुकतो. कारण उंचावर लाटून काम करणं दिसतं तेवढं सोपं नसतं. अतिशय कठीण कामांपैकी एक म्हणजे असं लटकून काम करणं. मात्र या बातमीत तुमची जे वाचणार आहात त्यानंतर तुमचं डोकं बधिर झाल्याशिवाय राहणार नाही. कुणी उंचावर काम करत असताताना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दोरी कुणी कापली तर? ही केवळ कल्पना केली तरीही आपल्या डोळ्यासमोर भीषण चित्र उभं राहतं. कुणाहीसोबत असा प्रकार घडू नये असंच आपल्याला वाटतं. बरं असं खरंच झालं आहे. तिला त्यांचा राग आला म्हणून तिने थेट 32 व्या मजल्यावर काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची दोरीचं कापली. पुढे जे घडलं ते अत्यंत भयंकर होतं. 

नेमकं घडलं काय? 

तिला इमारतीबाहेर काम करणारे कर्मचारी त्यादिवशी कामावर येणार हे सांगितलं गेलं नव्हतं. अचानक खिडकीतून तिला हे कर्मचारी दिसले आणि तिच्या डोक्यात तिडीक गेली. ही महिला एवढी चिडलेली की तिने थेट टोकाचा निर्णय घेतला आणि त्या कर्मचाऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. तिने हे कर्मचारी ज्या दोरीच्या आधारावर लटकून काम करत होते ती दोरीचा थेट कापली? 

आधी नाकारला गुन्हा मग... 

या महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं. या महिलेची कसून चौकशी करण्यात आली. मात्र तिने सुरुवातीला गुन्हा काबुल करण्यास थेट नकार दिला. मी असं काही केलंच नाही असा सूर या महिलेचा होता. मात्र पोलीस तिच्यापेक्षा हुशार होते. पोलिसांनी दोरीवरील CCTV,  बोटांची चिन्हं आणि फॉरेन्सिक रिपोर्ट्स  सादर केल्यावर तिच्याकडे काहीही पर्याय राहिला नाही. 

त्या कामगारांचं काय झालं...

उंचावर काम करताना कुणाची दोरीचं कापली तर नक्कीच मोठा अपघात होईल. तसाच अपघात तिथेही घडला. मात्र त्या कामगारांचं दैव बलवत्तर म्हणून त्यांना वाचवण्यात आलं. त्यांना 26 व्या मजल्यावरून खिडकीतून सुरक्षित बिल्डिंगमध्ये घेण्यात आलं. 

सदर घटना ही म्यानमारमधील आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचं समजतंय. पाहा याबाबतचा तिथला मीडिया रिपोर्ट : 

woman cuts ropes of workers working on 32nd floor in hi rise building