WWE स्टार कपलचं Break up, लग्नचं मोडण्याच्या तयारीत

साखरपुडा झाल्यावर या WWE स्टार कपलनं घेतला वेगळं होण्याचा निर्णय?

Updated: Dec 5, 2021, 04:15 PM IST
WWE स्टार कपलचं Break up, लग्नचं मोडण्याच्या तयारीत

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांमध्ये काही स्टार्सनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच नागा-समंथा, शिखर धवन यांनी घटस्फोट घेतल्याच्या चर्चा आता कुठे थांबत असताना आता WWE स्टार कपलचं ब्रेक अप झाल्याची बातमी समोर येत आहे. WWE मध्ये सर्वात पावरफुल कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Charlotte Flair आणि  Andrade यांचं ब्रेक अप झालं आहे. 

या दोघांनी आपल्या नात्यामध्ये ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे. तर एका अहवालानुसार त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही सध्या थांबवला आहे. या बातमीमुळे आता WWE चे चाहते हैराण झाले आहेत. WWE चॅम्पियन Charlotte Flair आणि स्टार Andrade हे दोघंही 2019 पासून एकमेकांना डेट करत होते. 

2020 मध्ये दोघांनी साखरपुड्याची घोषणा केली. आता दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 2020 मध्ये न्यू ईयरमध्ये Andrade ने खास पद्धतीनं Charlotte Flair ला प्रपोज केलं होतं. WWE मधून त्याने काही दिवसांपूर्वी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने AEW जॉइन केलं. 

Bodyslam.net ने आपल्या रिपोर्टमध्ये केलेल्या दावानुसार हे दोघंही आता वेगळे होण्याचा निर्णय घेत आहेत. या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो देखील केलं आहे. Charlotte Flair अमेरिकेतील रेसलर म्हणून ओळखली जाते. तिचं नाव Ashley Elizabeth Fliehr आहे. 

या दोघांनी वेगळं होण्यामागचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र लग्न देखील मोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.