चोरुन चोरुन PUBG खेळणाऱ्यांसाठी बातमी, लॅान्च झालं New Version

Krafton ने PUBG Mobile Lite चा नवीन वर्जन लॅान्च केला आहे. त्याला डाऊलोड करण्याचा सोपा उपाय पाहा.

Updated: Mar 24, 2021, 06:19 PM IST
चोरुन चोरुन PUBG खेळणाऱ्यांसाठी बातमी, लॅान्च झालं New Version title=

मुंबई : जर तुम्ही  PUBG खेळण्याचे शोकिन असाल आणि  PUBG बंद झाल्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोणत्यातरी Optionच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे.  कारण Krafton ने PUBG Mobile Lite चा नवीन वर्जन लॅान्च केला आहे. त्याला डाऊलोड करण्याचा सोपा उपाय पाहा.

PUBG Mobile Lite 0.20.1 चा Global Version लॉन्च

टेकसाइट sportskeeda च्या रिपोर्टनुसार Krafton ने PUBG Mobile Lite 0.20.1 चा ग्लोबल वर्जन लॉन्च केला आहे. परंतू हा वर्जन फक्त कमी किमतीतील स्मार्टफोनसाठीच उपलब्ध केला आहे.

कसे होईल डाऊनलोड

तुम्हाला हा PUBG Lite वर्जन डाऊनलोड करायचा असेल तर https://www.pubgmlite.com/en-US या साइटवर जाऊन, Download APK क्लिक करुन डाऊनलोड करु शकता. परंतु PUBG Mobile Lite 0.20.1 ला डाऊनलोड करण्या आधी तुम्हाला PUBG 0.20.0 हा वर्जन डाऊनलोड करावा लागेल.