नाशकात नववीतील विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची मैदानावर हत्या
ओझरमधल्या एका नावाजलेल्या शाळेत हा प्रकार घडला. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
काँग्रेसच्या प्रचार रॅलीत स्फोट, ३ जण ठार
कारच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने प्रचार रॅलीत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.पंजाबच्या भटिंडामध्ये ही दुर्घटना घडली.
बोरिवलीत शिवसेना-मनसेचे इनकमिंग, आऊटगोईंग
बोरिवलीत मनसे नगरसेवक चेतन कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबईत मनसेला आणखी एक मोठा धक्का बसलाय.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रिद्धीमान साहाचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे
उमेदवारीसाठी शौचालयासोबत फोटो अनिवार्य
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हजारोंच्या संख्येन इच्छुक उमेदवार आहेत.
मनसेकडून युतीचा प्रस्तावच नाही - संजय राऊतांचा प्रतिदावा
शिवसेना-मनसे युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी मनसेच्या युतीसंदर्भातल्या प्रस्तावावरून अजूनही शिवसेना-मनसेत वाद सुरू आहेत.
हिमस्खलनातील शहीद जवानांना संरक्षण मंत्र्यांकडून श्रद्धांजली
माछिलमध्ये झालेल्या हिमस्खलनात शहीद झालेल्या ५ जवानांना आज संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिल्ली विमानतळावर मानवंदना दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आपली भूमिका मांडणार
उद्या दादर, शिवाजी मंदिरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे, त्यावेळी राज ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत.
चंदुने कडकडून आजोबांना मिठी मारली
पाकिस्तानच्या तावडीतून सोडवून आणलेल्या जवान चंदु चव्हाणची त्याच्या कुटूंबासोबत तब्बल १२४ दिवसानंतर भेट झाली. चंदु आणि त्याच्या कुटूबांची भेट ही अमृतसरच्या सैनिक रूग्णालयात झाली. या भेटीवेळी चंदुचा भाऊ भूषण, आजोबा चिंधा पाटील आणि मित्र उपस्थित होते. चंदूच्या भावानं आणि आजोबांनी त्याची यावेळी कडकडून गळा भेट घेतली.
खुशखबर! एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे, आता एटीएममधून दिवसाला २४ हजार रूपये काढता येणार आहेत, हा निर्णय १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. मात्र आठवड्याला एटीएममधून २४ हजार रूपयेच काढता येणार आहेत. यापूर्वी एटीएममधून १० हजार रूपये काढता येत होते.