मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेवर छत्रपतींच्या नावाने खंडण्या वसुलीचा आरोप
युती तुटल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीकेचे तोफ डागली आहे. शिवसेनेचं नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपतींच्या नावाचा वापर भाषणांमध्ये करून, नंतर शिवछत्रपतींच्या नावाने खंडण्या वसूल करणाऱ्यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही.
पाकिस्तान टीमला वर्ल्डकपमध्ये खेळता येणार नाही
पाकिस्तानला टीमला २०१९ च्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण पाकिस्तानने यासाठी कोणतीही समाधानकारक कामगिरी दाखवलेली नाही.
लष्कर प्रमुखांकडे जवानांना थेट तक्रार करता येणार!
एका भारतीय जवानाने लष्कराला कशा प्रकारचा आहार दिला जातो, याविषयी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला होता, हा व्हिडीओ व्हायरल झाला. भारतीय जवानांना आपली तक्रार मांडण्यासाठी योग्य ती जागा नसल्याने त्यांनी सोशल मीडियाचा सहारा घेतला हे दिसून आलं.
मुंबईत मध्य रेल्वेचा रात्री विशेष मेगा ब्लॉक
मध्यरेल्वेच्या भायखळा स्थानकातल्या पादचारी पुलाच्या कामासाठी रात्रीच्या वेळेत विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
बालभारतीत रंगली होती अधिकाऱ्यांची दारूपार्टी?
राज्य शिक्षण मंडळाच्या पुण्यातल्या बालभारती विभागाशी संबंधीची धक्कादायक बातमी, आता आपण पाहणार आहोत
युती गोड बोलून तोडायला हवी होती- नितिन गडकरी
शिवसेनेला युती तोडायची होती तर ती गोड बोलून तोडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे 25 वर्षे युतीत शिवसेना सडल्याचा आरोप चुकीचा आहे. युतीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. तसंच दोन्ही पक्षांकडून होत असलेले आरोप-प्रत्यारोपही योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा तूर्त तरी विचार नाही-शरद पवार
राज्यातल्या भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा तूर्त तरी विचार नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
आश्रम शाळेतील २ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू
. जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील गोठणगाव इथल्या आश्रम शाळेतील मित्राला भेटण्यासाठी भरधाव वेगाने एकाच वाहनावर निघालेले होते.
केंद्रीय बजेटकडून शेतकऱ्यांना सर्वाधिक अपेक्षा
केंद्रीय बजेट जवळ येत आहे. या बजेट कडून संपूर्ण देशात सर्वाधिक अपेक्षा असतील तर त्या शेतकऱ्यांना आहेत.
सोशल मीडियावर भाजपची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी
युती तुटल्यावर आता भाजपनंही शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केलीय.सोशल मीडियावर शिवसेनेच्या 20 वर्षातल्या सत्तेवर टीका करणारी पोस्टर्स व्हायरल करण्यात येत आहेत.