गुड मॉर्निंग पथकाची उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई
सिल्लोड गावात नगरपालिकेच्या गुड मॉर्निंग पथकानं आणि पोलिसांनी एक उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोकांवर कारवाई केली.
कैद्याच्या मृत्यू प्रकरणी ३ पोलीस अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा
कोल्हापूरमध्ये पोलीस कोठडीत कैद्याच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
हिमस्खलनात महाराष्ट्रातले ३ जवान शहीद
जम्मू काश्मीरमधल्या गुरेज सेक्टर भागात झालेल्या हिमस्खलनात १५ जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या ३ जवानांचा समावेश आहे.
कैद्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी ५ पोलिस निलंबित
औरंगाबादमध्ये एका कैद्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी ५ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. आरोपीला तपासासाठी नेत असतांना आरोपीने गाडीतून उडी घेतली.
परिपत्रक काढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
सरकारी आस्थापनांमधून धार्मिक फोटो काढून टाकणे आणि धार्मिक विधी न करण्याचं परिपत्रक काढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, विनोद तावडे यांनी ही माहिती दिली आहे.
सावधान : पॅनकार्डचा बदलेला नियम पाहा
जर तुम्ही बँक खात्यात ५० हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम पुन्हा पुन्हा बँकेत जमा करत आहात, तर इनकम टॅक्स डिपार्टमेंटची तुमच्यावर नजर असणार आहे. पॅनकार्ड डिटेल देणे टाळण्यासाठी अनेक जण बँकेत ५० हजारापेक्षा कमी रक्कम जमा करताना दिसत आहेत. मात्र बँकांची नजर आता बँकेत २५ हजारापेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करणाऱ्यांवर आहे.
विराट कोहली सांगतोय, तो ओपनिंगला का आला?
कोहली या सामन्यात २९ धावा करून बाद झाला होता. विराट कोहलीचा हा निर्णय भारतासाठी महत्वाचा ठरला नाही. इंग्लंडने सात विकेट्स आणि ११ चेंडू राखून विजय मिळवला.
शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्वाच्या बाबी
शिवसेनेने भाजपाशी युती होण्याआधीच वचननामा प्रकाशित केला आहे, यावर बोलताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून हा वचननामा प्रकाशित करण्यात आला.
भाजपाशी युती बाबत बोलणी सुरू - उद्धव ठाकरे
शिवसेनेची भाजपाशी मुंबई महापालिकेत जागावाटपावरून चर्चा सुरू असताना, युती होण्याआधीच शिवसेनेकडून महापालिकेसाठी वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं आहे.
मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरूपम यांच्याविषयी प्रचंड नाराजी
मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे, मुंबई काँग्रेस नेते दिग्गज नेते आणि आमदार कृष्णा हेगडे हे भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर.