Salim Durani Dies At 88: भारतीय क्रिकेटरांसाठी आज सकाळीच एक दु:खद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर सलीम दुर्रानी (Salim Durani ) यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये कॅन्सरशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अर्जुन पुरस्काराने (Arjuna Award) सन्मानित झालेले दुर्रानी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू आहेत. दुर्राणी यांना 1960 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुर्रानीने भारतासाठी एकूण 29 कसोटी सामने खेळले आणि या कालावधीत 1202 धावा केल्या.
फिरकी अष्टपैलू सलीम दुर्रानी (Salim Durani Dies At 88) यांचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी काबुल, अफगाणिस्तान येथे झाला. मात्र दुर्रानी केवळ 8 महिन्यांचे असताना त्यांचे कुटुंब पाकिस्तानातील कराची येथे स्थायिक झाले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यावर दुर्रानी यांचे कुटुंब भारतात आले. दुर्रानी यांनी 60-70 च्या दशकात आपल्या अष्टपैलू कामगिरीने क्रिकेट विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. दुर्रानी हे भारताच्या क्रिकेट इतिहासातील एक तेजस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते होते. 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मुंबई कसोटीत त्यांनी पदार्पण केले. दुर्रानी आतिशी फलंदाजीसाठी ओळखला जाते होते.
वाचा : वीज दरवाढीचा ऐन उन्हाळ्यात भार, तुम्हाला ही दरवाढ योग्य वाटतये का?
सलीम दुर्रानी यांनी शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी 1973 रोजी मुंबईत इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर 1973 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतही हात आजमावला. सलीम यांनी 'चरित्र' या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात परवीन बाबी ही अतिशय सुंदर नायिका होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून सलीम दुर्रानी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, दुर्राणी हे क्रिकेटचे दिग्गज आणि जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता.
Salim Durani Ji had a very old and strong association with Gujarat. He played for Saurashtra and Gujarat for a few years. He also made Gujarat his home. I have had the opportunity to interact with him and was deeply impressed by his multifaceted persona. He will surely be missed.
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2023
मैदानावर आणि मैदानाबाहेरही ते त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जात होते.