जनधन योजनेवर विचारलेल्या प्रश्नावर गौतम गंभीर 'क्लीन बोल्ड'

गंभीर एका हिंदी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित होता.  

Updated: Apr 26, 2019, 04:33 PM IST
जनधन योजनेवर विचारलेल्या प्रश्नावर गौतम गंभीर 'क्लीन बोल्ड'  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची धामधूम देशभरात सुरु आहे. सत्ताधारी भाजप आपल्या केलेल्या कामांचं मोठ्या प्रमाणावर प्रचार करताना पाहायला मिळत आहे. परंतु लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षप्रवेश केलेल्यांना आपल्या पक्षाच्या योजने बद्दल माहिती नसल्याचं समोर आले आहे.

आपल्या तडाखेदार बॅटिंगने प्रतिस्पर्ध्यांना गार करणारा गौतम गंभीर एका प्रश्नांचं उत्तर देताना बोल्ड झाला. गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वीच म्हणजेच २२ मार्चला भाजपमध्ये प्रवेश केला. त्याला भाजप सरकारच्या विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर तो क्लीन बोल्ड झालेला पाहायला मिळाला.

गौतम गंभीर पूर्व दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या गंभीरला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्याने भलतेच उत्तर दिल्याने तो चांगलाच चर्चेत आला आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमाला गंभीर उपस्थित होता. यावेळेस त्याला पत्रकारांनी जनधन योजनेबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नावर गंभीर उज्जवला योजनेबद्दल माहिती देऊ लागला. त्यामुळे गंभीर चांगलाच गोंधळलेला पाहायला मिळाला. तसेच या प्रश्नाच उत्तर देताना गंभीर बोल्ड झाला. गंभीरला पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर गंभीरने पु्न्हा तेच उत्तर दिलं.

पुढे विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची उत्तर गंभीरने बरोबर दिली. या कार्यक्रमात गंभीर सोबत उपस्थित असलेल्या आमदार ओपी शर्मा यांच्या मदतीने गंभीरने उत्तरं दिली. दिल्लीच्या पूर्व लोकसभा मतदार संघातून भाजप खासदार महेश गिरी यांना डावलून गंभीरला उमेदवारी देण्यात आली. गंभीरच्या समोर काँग्रेसच्या अरविदंर सिंह लवली यांचे आव्हान असणार आहे. दिल्लीमध्ये १२ मे ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.