Ajay Jadeja Love Story: भारतीय क्रिकेट संघात अशी काही खेळाडू आहेत जे वर्षानुवर्षे काहींना काही गोष्टींमुळे सतत चर्चेत असतात. असे काही खेळाडू आहेत जे मैदान तर गाजवतातच त्याच सोबत बाकीच्या अनेक चर्चेचे कारण बनतात. यातली एक नाव म्हणजे अजय जडेजा. अजय जडेजा या खेळाडूची खेळाच्या तुलनेत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची बरीच चर्चा केली आहे. आता वयाच्या ५३ व्या वर्षी जडेजा क्रिकेटपासून दूर असूनही चर्चेत आहे कारण तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आहे.
बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते खूप जुने आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड स्टार अभिनेत्रींसोबत लग्न केले आहे. कुणाचं प्रेम सफल झालं तर कुणाची लव्ह स्टोरी अपूर्ण राहिली. या यादीत अजय जडेजाचाही समावेश आहे. ९० च्या दशकात माधुरी आणि जडेजा यांच्या नात्याच्या चर्चा शिगेला पोहोचल्या होत्या. बॉलिवूडच्या या सुंदर अभिनेत्रीवर जडेजाचा जीव जडला होता.
त्या काळात जडेजा टीम इंडियाचा उपकर्णधार होता, त्याच्या अनेक महिला चाहते ही होते. माधुरी आणि अजय जडेजा यांची प्रेमकहाणी एका मॅगझिनच्या फोटोशूटदरम्यान सुरू झाली. दोघेही मॅगझिनच्या पानावर एकत्र झळकले. त्यावेळी त्याच्या डेटिंगच्या चर्चाही तीव्र झाल्या. अजय जडेजा राजघराण्यातील असल्याने अशा परिस्थितीत जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा जडेजाच्या कुटुंबीयांनी त्याचे ऐकले नाही आणि लग्नासाठी स्पष्ट नकार दिला असे सांगितले जाते. दरम्यान, जडेजाच्या कारकिर्दीलाही चांगले वळण मिळाले नाही.
1999 मध्ये अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित यांच्या नात्यात दुरावा आला होता. जडेजा मॅच फिक्सिंगमध्ये अडकला आणि त्यांची प्रेमकहाणी स्वप्नासारखी अपूर्ण राहिली. तो मोहम्मद अझरुद्दीनसोबत फिक्सिंगमध्ये अडकला, ज्याची खूप चर्चा झाली. यानंतर माधुरीच्या कुटुंबीयांनीही जडेजाकडे पाठ फिरवली असेही म्हंटल जाते. माधुरीनेही त्यांचे नातं संपवले आणि अमेरिकेला गेली. जिथे तिने डॉ.श्रीराम नेने यांची भेट घेतली आणि दोघांचे लग्न झाले. दुसरीकडे जडेजाचेही लग्न झाले.
अजय जडेजाला जामनगरचा महाराजा घोषित करण्यात आले. त्यामुळे त्यांनी मालमत्तेने मोठी झेप घेतली. त्यांची एकूण संपत्ती पूर्वी 250 कोटी रुपये होती. मात्र आता ते 1455 कोटी रुपये झाले आहे. निवृत्तीनंतर त्यांचे उत्पन्न कॉमेंट्री आणि कोचिंगमधून येत होते. पण आता तो भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये अव्वल स्थानी आला आहे. त्याने विराट कोहलीचाही पराभव केला आहे.