मुंबई : २१ डिसेंबरला दिल्लीत कौटुंबिक रिसेप्शन झाल्यानंतर आज विराट आणि अनुष्का मुंबईत रिसेप्शन देणार आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली इटलीमध्ये या महिन्यात विवाह बंधनात अडकले. आज या दोघांनी मुंबईत बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर्ससाठी रिसेप्शन ठेवले आहे. आता या रिसेप्शनमध्ये दोघे वेस्टर्न लूकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. सब्यसाची ही भारतातील लोकप्रिय डिझाइनर आहे. तिने डिझाईन केलेले काही वेस्टर्न लूक हे दोघे फॉलो करणार की इंडियन लूकमध्ये दिसणार हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे.
२१ डिसेंबरला दिल्लीमधील हॉटेल ताजमध्ये यांच्या रिसेप्शनला अनेक मोठ्या व्यक्ती पोहोचल्या होत्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या रिसेप्शनला उपस्थित होते. आज मुंबईत सेंट रेजिस हॉटेलमध्ये हे रिसेप्शन होणार आहे. यासाठी अनेक दिग्गज पोहोचणार आहेत. ९ व्या माळ्यावर याचं आयोजन करण्यात आलं आहे.