...म्हणून धोनीचा यंदाचा ख्रिसमस ठरला स्पेशल!

श्रीलंकेसोबतची सीरीज संपताच टीम इंडियात ख्रिसमसचा उत्साह संचारला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 26, 2017, 12:56 PM IST
...म्हणून धोनीचा यंदाचा ख्रिसमस ठरला स्पेशल! title=

मुंबई : श्रीलंकेसोबतची सीरीज संपताच टीम इंडियात ख्रिसमसचा उत्साह संचारला आहे. सर्वांनी आपल्या कुटुंबियांसोबत आणि जवळच्या मित्रमंडळींसोबत ख्रिसमस साजरा केला. मात्र महेंद्र सिंग धोनीसाठी यंदाचा ख्रिसमस काही खास होता.

काय आहे कारण?

कारण यंदा त्याच्या छोट्या परीने म्हणजे झिवाने त्याला छानसे गिफ्ट दिले. झिवाने त्याला खास ख्रिसमस सॉन्ग ऐकवले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अशा दिल्या धोनीने शुभेच्छा...

इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडिओत झिवा, धोनीच्या मांडीवर बसली आहे आणि ख्रिसमस सॉन्ग गात आहे. धोनी तिचे हे गाणे अत्यंत आनंदाने गात आहे. या व्हि़डिओ अपलोड करत धोनीने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

 

Merry Christmas !!

A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivasinghdhoni006) on

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरूद्ध झालेल्या टी20 च्या शेवटच्या मॅचमध्ये भारताने ५ विकेट्स राखत विजय प्राप्त केला. या विजयाचे सेलिब्रेशन टीम इंडियाने सांताची टोपी घालून केले.