वन डे रॅंकिंगमध्ये विराट कोहलीच बादशाह

 आयसीसीने शुक्रवारी जाहिर केलेल्या वनडे रॅंकिंगमध्ये  भारतीय कॅप्टन विराट कोहलीने बॅट्समॅनच्या यादीत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. कोहलीचे ८७३ पॉईंट्स आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 18, 2017, 06:43 PM IST
 वन डे रॅंकिंगमध्ये विराट कोहलीच बादशाह title=

नवी दिल्ली :  आयसीसीने शुक्रवारी जाहिर केलेल्या वनडे रॅंकिंगमध्ये  भारतीय कॅप्टन विराट कोहलीने बॅट्समॅनच्या यादीत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. कोहलीचे ८७३ पॉईंट्स आहेत.

ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर आणि कोहलीमध्ये १२ पॉईंट्सचा फरक आहे. या गुण तालिकेत महेंद्र सिंग धोनी (१२ व्या), शिखर धवन (१३ व्या) आणि वाईस कॅप्टन रोहित शर्मा (१४ व्या) स्थानी आहे.ृ

कोणताच भारतीय बॉलर टॉप टेनमध्ये नाहीए. फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (१३व्या) स्थानी आहे. आयसीसी वनडे रॅंकिंगमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचे आता ११४ पॉईंट्स आहेत आणि ३-२ अशी सिरीज जिंकल्यास ११३ पॉईंट्स होऊ शकतील. 

 श्रीलंका ८८ पॉईंट्सने आठव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज १० गुणांनी श्रीलंकेच्यामागे आहे.  भारताशी ४-१ ने सामना जिंकला तरीही लंकेचे ८८ पॉईंट्सच राहणार आहेत.

पण वेस्ट इंडिजने पुढच्या काही सामन्यात चांगला खेळ केला तर ते लंकेच्या पुढे जाऊ शकतात.