दारु की साप...काय जास्त विषारी! दारुड्याला चावला विषारी किंग कोबरा, आणि पाहा काय झालं

साप चावल्याने माणसाचा मृत्यू होतो हे तुम्ही ऐकलं असेल पण... Video व्हायरल

Updated: Oct 15, 2022, 06:04 PM IST
दारु की साप...काय जास्त विषारी! दारुड्याला चावला विषारी किंग कोबरा, आणि पाहा काय झालं title=

King Cobra Attack: विषारी साप चावल्याने (Poisonous Snake) माणसाचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का साप माणसाला चावल्यानंतर सापाचाच मृत्यू झाला. एका व्यक्तीने हा दावा केला आहे. सोशल मीडियावर (Social Media) या व्यक्तीचा व्हिडिओ (Video) चांगलाच व्हायरल होत आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Paradesh) कुशीनगर (KushiNagar) इथं एका व्यक्तीवर विषारी किंग कोबरा (King Cobra) सापाने हल्ला केला. सापाने त्या व्यक्तीच्या पायाचा चावा घेतला. आता तुम्हाला वाटलं असेल की त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा किंवा त्यांची प्रकृती अत्यवस्थ असेल. पण तुम्ही विचार करताय त्यापेक्षा भलतीय गोष्ट घडली. या संपर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 

साप चावलेल्या व्यक्तिने केला दावा
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत (Video) आपण बघू शकतो. एका हॉस्पीटलमध्ये (Hospital) एक व्यक्ती डॉक्टरशी बोलत आहे. त्या व्यक्तीने केलेल्या दाव्यानुसार किंग कोबरा त्याच्या पायाला दोन वेळा डसला. पण काही वेळाताच किंग कोबराचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे त्या व्यक्तीने आपल्याबरोबर पिशवीतून मेलेला सापही हॉस्पीटलमध्ये आणला होता.

डॉक्टरही झाले हैराण
हा व्यक्ती दारु प्यायला होता, त्यामुळे तो दारुच्या नशेत काहीतरी बरळत असेल असं डॉक्टरांना वाटलं. पण व्हिडिओत त्याच्या पायाला साप चावल्याच्या खूणाही दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. दोन वेळा अत्यंत विषारी साप चावल्यानंतरही त्या व्यक्तीला काहीच झालं नाही. उलट सापाचाच मृत्यू झाला. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.