सारा सचिन तेंडुलकर लंडनमधून पदवीधर

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा ही लंडन विद्यापीठातून पदवीधर झाली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 7, 2018, 06:56 PM IST
सारा सचिन तेंडुलकर लंडनमधून पदवीधर
छाया सौजन्य - सचिन तेंडुलकर फेसबूक वॉल

मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा ही लंडन विद्यापीठातून पदवीधर झाली आहे. साराने पदवी धारण केल्यानंतर सचिन तेंडुलकर यांनी ट्विट केलेय. साराच्या या यशाने आपला अभिमानाने ऊर भरुन आलाय, असे साराचे वडील म्हणजेच सचिन तेंडुलकर यांनी म्हटलेय. 

त्यांनीच ही गोष्ट चाहत्यांना ट्विटरवरुन कळवली आहे. "सारा मला आणि अंजलीला तुझा अभिमान आहे. असं ट्विट सचिन ने केलं असून  conquer the world Sara असंही सचिनने म्हटलंय. साराच्या पदवीदान समारंभाला सचिन आणि अंजली तेंडुलकर यांनी खास उपस्थिती लावून लाडक्या लेकीचे कौतुक केले.