आयफा पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीने सर्वांसमोरच सँडल काढली आणि...

अभिनेत्रीने सर्वांसमोरच चक्क... 

Updated: Sep 19, 2019, 02:33 PM IST
आयफा पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीने सर्वांसमोरच सँडल काढली आणि...  title=

मुंबई : कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींचा अंदाजही कायमच अनोखा असतो. दिमाखदार सोहळ्याला साजेशी वेशभूषा आणि त्याच दिमाखात येणाऱ्या सेलिब्रिटी हे सारंकाही कितीही हेवा वाटणारं असलं तरीही याची एक दुसरी बाजूही आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात त्याचा प्रत्यय आला. ज्यावेळी रेड कार्पेटवर आलेल्या एका अभिनेत्रीने सर्वांसमोरच चक्क तिच्या पायातील सँडल काढली. 

आयफाच्या रेड कार्पेटवर अनेक अभिनेत्री दिलखेचक अंदाजात दिसत होत्या, त्यातच स्वरा भास्करसुद्धा अनोख्या रुपात सर्वांसमोर आली होती. पण, स्वराला एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरं जावं लागलं. 

आयफासाठी स्वरा सफेद रंगाच्या एका सुरेख गाऊनमध्ये आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी जेव्हा माध्यमांच्या छायाचित्रकारांसमोर पोझ देण्यासाठी आली तेव्हा तिची सँडल गाऊनमध्ये अडकली आणि स्वराचा तोड जाता जाता राहिला. 

 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

मुख्य म्हणजे त्या प्रसंगात मोठ्या शिताफीने शक्कल लढवत स्वराने सर्वांसमोरच सँडल काढ़ली आणि पुन्हा कॅमेऱ्यांसाठी पोझ दिली. यावेळी काही क्षणांसाठी तिच्या चेहऱ्यावरील भाव मात्र पाहण्याजोगे होते. या एका क्षणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे आयफाच्या निमित्ताने ही 'रांझणा' फेम अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.