मुंबई : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलचा 'उरी' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमामुळे विक्की कौशलच सगळीकडून कौतुक होत आहे. तसेच हा सिनेमा किर्तीसोबतच पैसा कमावण्यात देखील यशस्वी ठरला आहे.
जम्मू काश्मीरच्या उरीत 2016 साली आर्मी कॅम्पमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संपूर्ण देशाला हादरा बसला. या हल्याचा बदला घेण्यासाठी 'सर्जिकल स्ट्राइक' करण्यात आलं. ज्यामध्ये आपल्या जवानांना यश मिळालं.
#UriTheSurgicalStrike day-wise growth...
Sat [vis-à-vis Fri]: 51.59%
Sun [vis-à-vis Sat]: 21.48%
Taking into account the terrific trending, #Uri is expected to maintain a super-strong grip on weekdays. India biz. #HowsTheJosh— taran adarsh (@taran_adarsh) January 14, 2019
या सर्जिकल स्ट्राइकची संपूर्ण गोष्ट पडद्यावर 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमातून मांडली आहे. खऱ्या घटनेवर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला पडला आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या 8.25 करोड रुपये आणि दुसऱ्या दिवशी 12.25 करोड रुपये, तिसऱ्या दिवशी 14.50 करोड रुपयांची कमाई केली आहे. सोमवारी चौथ्या दिवशी 9.95 करोड रुपयांची कमाई केली आहे. यानुसार सिनेमाने आतापर्यंत 45 करोड रुपयांची कमाई केली आहे.
#UriTheSurgicalStrike emerges the FIRST HIT of 2019... Indeed, 2019 has started with high josh... Sets the BO on on Day 3... Packs a solid total in its opening weekend... Fri 8.20 cr, Sat 12.43 cr, Sun 15.10 cr. Total: ₹ 35.73 cr. India biz. #Uri #HowsTheJosh
— taran adarsh (@taran_adarsh) January 14, 2019
आदित्य धर दिग्दर्शित 'उरी' या सिनेमात विक्की कौशलसोबतच मोहित रैना, यामी गौतम, परेश रावल, कृति कुल्हारी, स्वरूप संपत आणि रजित कपूर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.