'देवा' सिनेमाला टक्कर देणारा 'टायगर जिंदा है' का पाहावा याची 5 कारणं

 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 21, 2017, 03:55 PM IST
'देवा' सिनेमाला टक्कर देणारा 'टायगर जिंदा है' का पाहावा याची 5 कारणं title=

 

मुंबई : अखेर सलमान खानच्या फॅन्सतचा ख्रिसमस दमदार जाणार आहे. 

याला कारण आहे सलमान - कतरिनाचा 'टायगर जिंदा है' हा सिनेमा शुक्रवारी उद्या रिलिज होत आहे. या सिनेमाला घेऊन फॅन्स र उत्सुक आहेतच. पण मराठी सिनेमा विरूद्ध बॉलिवूड हा वाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे. 
टायगर हा सिनेमा प्रदर्शित होण्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मात्र असं काहीही असलं तरीही सलमान या सिनेमाकडे आशेने पाहत आहे. कारण या वर्षाच्या सुरूवातीला ट्युबलाईट आला मात्र तो बॉक्स ऑफिसवर खास काही गल्ला जमवू शकला नाही. त्यामुळे या सिनेमाला अॅडव्हान्स बुकिंग चाहत्यांनी केल्यामुळे सलमान खूष आहे. 

काय अशी 5 कारणं आहेत ज्यासाठी सलमानचा टायगर जिंदा है हा सिनेमा पाहावा?

सलमान - कतरिना जोडी 
सलमान खान आणि कतरिना कैफ तब्बल 5 वर्षांनी एकत्र सिनेमांत दिसणार आहे. 2012 मध्ये एक था टायगर या सिनेमांत शेवटचे दिसले होते एकत्र. तसेच जोया आणि टायगर यांना एकत्र बघण्याचा मौका देखील पाहायला मिळणार आहे. 

सलमान खानची अॅक्शन 

ट्युबलाईट या सिनेमांत सलमान खान अगदी मासूम अंदाजात दिसला होता. मात्र सलमानचे फॅन्स त्याला कायम दबंग रूपात पाहायला पसंद करतात. त्यामुळे ट्युबलाईटमध्ये खानची अॅक्शन मिस करणाऱ्या फॅन्सना ही पर्वणी आहे. 

लोकेशन्स 
या सिनेमाला पाहण्यासाठी दर्शक खास उत्सुक आहेत त्याच खास कारण आहे एक्साइटमेंट. हा सिनेमा मोरक्को, ग्रीस सारख्या अनेक सुंदर जागांवर या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. या मोठ्या पडद्यांवर सलमान - कतरिनाला या सुंदर लोकेशनवर पाहण पर्वणीच असणार आहे. 

कथा 

2012 मध्ये आलेली एक था टायगर ही फिल्म अतिशय सुंदर होती कारण त्या सिनेमाची कथा. अॅक्शन - सप्सेंस बरोबरच या सिनेमाचा सिक्वल देखील महत्वाचा ठरला आहे. या सिनेमांत अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या सिनेमांत देखील कथा महत्वाची असणार यात शंकाच नाही. 

ख्रिसमस गिफ्ट 
या सिनेमाचा पोस्टर लाँच केला तेव्हा सलमान खानने सांगितले की चाहत्यांसाठी हे ख्रिसमस गिफ्ट आहे. या सिनेमासोबत आणखी कोणताही बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित होत नाही. त्यामुळे याचा फायदा सलमानच्या या सिनेमाला नक्कीच होणार आहे.