69th National Film Award : अल्लू अर्जुनचा हा अंदाज पाहून तुम्हीही पडाल त्याच्या प्रेमात

पार पडत असलेल्या या कार्यक्रमात अल्लू अर्जुन, एसएस राजामौली आणि एमएम कीरावनी यांना दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं होतं.

Updated: Oct 17, 2023, 04:10 PM IST
69th National Film Award : अल्लू अर्जुनचा हा अंदाज पाहून तुम्हीही पडाल त्याच्या प्रेमात title=

मुंबई : 24 ऑगस्ट 2023 रोजी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्याच वेळी, आता याचा सादरीकरण सोहळा आज म्हणजेच 17 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडत आहे. भारताच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करत आहेत. या सोहळ्यासाठी अनेक चित्रपट सेलिब्रिटी दिल्लीत पोहोचले आहेत. 

पार पडत असलेल्या या कार्यक्रमात अल्लू अर्जुन, एसएस राजामौली आणि एमएम कीरावनी यांना दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं होतं. तर आलिया भट्ट, रणबीर कपूर, और करण जौहरसोबत अपूर्व मेहताला कलिना एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं होतं. हे सगळे प्रसिद्ध कलाकार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा भाग असणार आहेत.

अल्लू अर्जूनचा हा आपलेपणा तुम्हालाही भावू शकतो. नुकतेच सर्वश्रेष्ठ विशेष प्रभाव: वी श्रीनिवास मोहन (आरआरआर) सर्वश्रेष्ठ कोरियोग्राफी: प्रेम रक्षित (आरआरआर) हे पुरस्कार प्रधान करण्यात आले मात्र सगळ्यांच्या नजरा खिळल्या त्या म्हणजे अल्लू अर्जूनवर. हे सगळे क्षण अल्लूने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केल्या आहेत. हा सगळा प्रकार पाहून त्याचे चाहते त्याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडतील एवढं मात्र नक्की. अल्लू अर्जूनच्या शेजारी अभिनेत्री क्रिती सेनन बसली आहे. आणि ती देखील अल्लूसोबत काहीतरी बोलताना दिसत आहे.

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला आज दुपारी 3 वाजता सुरुवात झाली आहे. डीडी नॅशनल आणि त्याच्या यूट्यूब चॅनलवर त्याचे थेट प्रक्षेपण सुरु आहे. दूरदर्शन नॅशनलच्या सोशल मीडिया हँडलने एक पोस्टर जारी केले आणि माहिती दिली, 'विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रतिभा आणि उत्कृष्टता साजरी करा. DD National वर, मंगळवार, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजता आमच्याशी थेट सामील व्हा.

2021 मध्ये CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) कडून प्रमाणपत्र मिळालेल्या भारतीय चित्रपटांसाठी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जात आहेत. भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरुवात 1954 साली झाली. हा पुरस्कार सोहळा भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाने आयोजित केला आहे