'तारक मेहता...' मधील भिडेच्या मुलीची चर्चा, व्हिडिओ व्हायरल

तारक मेहता का उल्टा चष्मा या कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील जेठालाल, दया बेन सह बालकलाकार देखील चांगलेच चर्चेत असतात.

Updated: Aug 1, 2021, 06:29 PM IST
'तारक मेहता...' मधील भिडेच्या मुलीची चर्चा, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा या कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील जेठालाल, दया बेन सह बालकलाकार देखील चांगलेच चर्चेत असतात.

त्यात या मालिकेत सोनू हे पात्र साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानी एका व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या अभिनयाचं नेहमीच चाहत्यांकडून कौतुक केलं जातं. पण पलकला अभिनयासोबत डान्सची देखील भारी आवड आहे. ती शास्त्रीय नृत्य देखील करते.

सोनूचा डान्स व्हिडिओ

पलकने नुकताच डान्स व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना आपल्या आणखी एका टॅलेंटची ओळख करुन दिली आहे. पलक वहिदा रेहमानच्या 'पिया तो से' या गाण्यावर तिच्या शिक्षकांसोबत नाचत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

पलकच्या घायाळ करणाऱ्या अदा

पलकने या व्हिडिओत निळ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला आहे. पलकने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'अचानक बनवलेल्या रिल्स विलक्षण असतात. मी ज्या व्यक्तीसोबत आहे ती एक सुंदर आणि उत्कृष्ट नृत्यांगना आहे."