Kiran Rao ने बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याचं नाव घेताच Aamir Khan गोंधळला

आमिर खानला बसला मोठा धक्का 

Updated: Jul 17, 2021, 08:43 AM IST
Kiran Rao ने बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याचं नाव घेताच Aamir Khan गोंधळला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) हे आता एकमेकांपासून दूर आहेत. या दोघांनी सहमताने घटस्फोट घेतला आहे. मात्र दोघेही घटस्फोट घेतल्यानंतरही एकत्र स्पॉट झाले आहेत. आमिर आणि किरण सध्या लडाखमध्ये आहेत. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओज समोर येत आहेत. 

रणबीरमुळे भडकला आमिर 

आमिर खान एक्स वाइफ किरण रावकरता खूप पझेसिव असल्याचं समोर आलं आहे. करण जोहरच्या कार्यक्रमात याबाबतचा खुलासा झाला आहे. किरण रावने शो दरम्यान अनेकदा अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) चं नाव घेतलं. यानंतर आमिर आश्चर्यचकित झाला. त्यावर आमिर कार्यक्रमात म्हणाला,'आता त्याला रणबीर कपूरशी बोलावचं लागेल.'

घटस्फोटानंतरही आमिर-किरण एकत्र

आमिर खान आणि किरण राव यांनी सोशल मीडियावर आपल्या घटस्फोटाची अधिकृत माहिती दिली. दोघांनी एक व्हिडीओ बनवून एकमेकांचा हात हातात घेऊन याबाबतची माहिती दिली होती. नात्यात कोणताच दुरावा, कटूपणा नाही. आम्ही आजही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. 

आमिर-किरणचा व्हिडीओ व्हायरल 

आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटानंतर दोघांचा एक डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ लाला सिंह चड्ढा या सिनेमाच्या सेटवरचा आहे. व्हिडीओ हे दोघं पारंपरिक ड्रेसमध्ये दिसत आहेत.