आस्ताद काळेची 'ही' अभिनेत्री गर्लफ्रेंड

ही आहे आस्ताद काळेची गर्लफ्रेंड

आस्ताद काळेची 'ही' अभिनेत्री गर्लफ्रेंड  title=

मुंबई : 'सरस्वती' या मालिकेतून अभिनेता आस्ताद काळा हा घराघरात पोहोचला. आस्तादने या मालिकेत ''राघव'' ही भूमिका साकारली आहे. आजही प्रेक्षक आस्तादला राघव या नावानेच ओळखतात. छोट्या पडद्यावर काम करणार आस्ताद अतिशय लोकप्रिय आहे. अग्निहोत्र, पुढचं पाऊल सारख्या मालिकेतून आस्तादने आपली वेगळी छटा उमटवली आहे. तसेच आस्तादने सिनेमा, नाटकांमध्ये देखील काम केलं आहे. आस्तादचा नुकताच वाढदिवस झाला आहे. 35 व्या वर्षात आस्तादने पदार्पण केलं आहे. 

अभिनेता आस्ताद खूप चांगला गायक देखील आहे. त्याच्या अभिनयाप्रमाणेच प्रेक्षक त्याची गाणी देखील पसंद करतात. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे हे प्रेक्षकांना जाणून घेण्यात देखील अधिक रस असतो. आस्तादचं त्याची को स्टार प्राची माटे हिच्यावर प्रेम होतं. अग्निहोत्र, चार दिवस सासूचे या मालिकांमध्ये प्राचीने काम केलं आहे. प्राची आणि आस्ताद चार दिवस सासूचे या मालिकेत एकत्र काम करत होते आणि तेव्हाच या दोघांची मन जुळली. मात्र नियतीला हे काही मान्य नव्हतं. 23 वर्षाच्या प्राचीला अगदी दुर्लभ असा कॅन्सर झाला होता. प्राचीला बोनमॅरो कॅन्सर होता आणि तिचा आजार अंतिम टप्प्यात असताना त्याचे निदान झाले होते. प्राचीची तब्येत दिवसेंदिवस ढासाळायला लागली होती. त्यामुळे तिने मालिकांमध्ये काम करणे देखील सोडले होते. तिच्या शेवटच्या दिवसांत अस्ताद तिच्या सतत सोबत होता. तिचे निधन होऊन पाच वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. यामध्ये तिचा दुर्दैवी अंत झाला. हे दुःख आस्ताद विसरू शकला नाही. आणि यामुळेच तो आतापर्यंत सिंगल होता. महत्वाची बाब म्हणजे आस्तादने छोट्या पडद्यावर भरपूर काम केलं आहे. पण त्याचं नाव कोणत्याही को स्टारसोबत कधीच जोडलं नव्हतं. 

पण आता वयाच्या 35 व्या वर्षी आस्तादने त्याच्या खाजगी आयुष्यातील खास गोष्ट शेअर केली आहे. आस्तादने आपल्या नव्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं आहे. स्वप्नाली पाटील असं आस्तादच्या गर्लफ्रेंडच नावं आहे. अस्तादची एक प्रेयसी असून ती अभिनयसृष्टीशीच संबंधित आहे. एका कार्यक्रमाच्या एपिसोडमध्ये त्याच्या फॅनने त्याला प्रपोज केले होते. ती म्हणाली होती की, तुझी कोणी गर्लफ्रेंड नसेल तर मला तुझी गर्लफ्रेंड व्हायला आवडेल त्यावर उत्तर देताना स्वप्ना त्याची प्रेयसी असल्याचे त्याने सांगितले होते. ही स्वप्ना म्हणजे स्वप्नाली पाटील असून तिने ''पुढचे पाऊल'' या मालिकेत त्याच्यासोबत काम केले होते. ते दोघे अनेक वर्षांपासून नात्यात असल्याचे म्हटले जात आहे.