अभिनय बेर्डेच्या फेक फेसबुक अकाऊंटवरून बोल्ड फोटोची मागणी

प्रिया बेर्डेंनी शेअर केलं अकाऊंट 

Updated: Jan 19, 2020, 12:35 PM IST
अभिनय बेर्डेच्या फेक फेसबुक अकाऊंटवरून बोल्ड फोटोची मागणी  title=

मुंबई : सोशल मीडियावर अभिनेत्यांच्या खासगी अकाऊंटसोबत त्यांचे असंख्य फॅनपेज देखील असतात. तसेच फेक अकाऊंट देखील ओपन केले जातात. असंच फेक अकाऊंट अभिनेता अभिनय बेर्डेचं तयार करण्यात आलं आहे. या फेक अकाऊंटवरून तरूणीकडे बोल्ड फोटोची मागणी करण्यात आली. याबाबतची माहिती अभिनयची आई अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी केली आहे. तसेच या अकाऊंटविरोधात कारवाई केली जाणार आहे. 

अभिनयच्या फेक अकाऊंटचा स्क्रीन शॉट प्रिया यांनी शेअर केला असून,'सावधान... हे प्रोफाइल अभिनयचे नाही...' अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. 'सावधान .....हा प्रोफाइल अभिनयचा नाही, या प्रोफाइल वरून एका मुलीला कॉन्टॅक्ट केलं गेलं आणि सांगितलं की नागराज मंजुळे बरोबर एक फिल्म करतोय आणि त्यात बोल्ड सिन आहेत आणि तुझा एक बोल्ड फोटो पाठवून दे तर त्या मुलीने आम्हाला कॉन्टॅक्ट करून वरील माहिती दिली तेव्हा प्लिज कुणीही याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, आम्ही ऍक्शन घेत आहोत..या आधीही मी याबाबत पोस्ट टाकली होती हे ही नमूद करतेय', अशी पोस्ट प्रिया बेर्डेंनी लिहिली आहे. 

अभिनय बेर्डेच्या फेक अकाऊंटबद्दल ही पोस्ट लिहून सावधान केलं आहे. यामुळे चाहत्यांनी आणि नेटीझन्सनी याची काळजी घ्यावी. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा मुलगा म्हणून अभिनयला कायमच प्रेक्षकांच भरपूर प्रेम मिळालं आहे. तसेच आता त्याने देखील सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्यामुळे त्याचा असा वेगळा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. 'ती सध्या काय करते', 'रंपाट' आणि 'अशी ही आशिकी' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.