मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे सुखी आणि आनंदी जीवन जगत आहेत. त्यांना एक छोटी मुलगी देखील आहे. परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहित आहे की, ऐश्वर्यासोबत लग्न होण्यापूर्वी अभिषेकचा करिश्मा कपूरसोबत साखरपूडा होणार होता. अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त अभिषेक आणि करिश्मा यांची एंगेजमेंट होणार असल्याचं सर्वांना सांगण्यात आलं. तेव्हापासून चाहते दोघांच्याही लग्नाची वाट पाहत होते.
मात्र त्यानंतर करिश्मा आणि अभिषेक लग्न करणार नसल्याचे समोर आल्याने लोकांना धक्काच बसला. त्यानंतर या दोघांचं लग्न अचानक का मोडलं? त्यांच्यामध्ये नक्की काय घडलं असेल? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता, परंतु कोणाला याबद्दल फारशी काही माहिती नव्हती.
बच्चन आणि कपूर कुटुंबीयांनी यामागील कारणाबद्दल पूर्णपणे मौन बाळगलं होतं. मात्र, मीडिया रिपोर्ट्समध्ये करिश्मा आणि अभिषेकने लग्न न करण्याच्या कारणाबाबत वेगवेगळे दावेही केले होते.
असाच एक दावा मीडियासमोर आला, ज्यामध्ये असं समजत आहे की, करिश्माची आई बबिता यांनी अमिताभ बच्चन यांच्यासमोर अशा काही अटी ठेवल्या होत्या ज्या बच्चन कुटुंबाने मान्य करण्यास नकार दिला होता. त्यामुळे बच्चन कुटुंब आणि कपूर कुटुंबीय यांच्यातील संबंध बिघडले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बबिता यांना त्यांची मुलगी करिश्माची आर्थिक बाजू भक्कम करायची होती. ज्यासाठी त्यांनी बच्चन कुटुंबाला त्यांच्या मालमत्तेचा मोठा हिस्सा अभिषेकच्या नावावर करण्यासाठी सांगितले होते जेणेकरून त्यांच्या मुलीला नंतर कोणतीही आर्थिक समस्या येऊ नये. बच्चन कुटुंबाने तसं करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने हे लग्न तुटलं असे सांगितलं जात आहे.
तसेच असेही म्हटले जाते की, अभिषेक बच्चनची आई जया बच्चन यांना करिश्मा कपूरने लग्नानंतर तिचं अभिनय करिअर सोडण्यासाठी सांगितलं होतं. ही अट करिश्माला मान्य नव्हती. या सर्व कारणांमुळे करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न होऊ शकले नाही. ही सगळी कारण मीडियासमोर आली आहेत, परंतु यामागील खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसेच दोन्ही कुटूंबीयांपैकी कोणीही याबद्दल काही वक्तव्य केलं नाही.