मुळशी पॅटर्नवर 'या' बॉलिवूड अभिनेत्याची प्रतिक्रिया

सिनेमाचं सगळीकडून होतंय कौतुक 

मुळशी पॅटर्नवर 'या' बॉलिवूड अभिनेत्याची प्रतिक्रिया

मुंबई : प्रवीण तरडे लिखीत आणि दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' या सिनेमाचं भरभरून कौतुक होत आहे. एका तालुक्याची नाही अख्ख्या देशाची गोष्ट... म्हणत या सिनेमाने आता बॉलिवूडकरांना देखील भुरळ घातली आहे. एका बॉलिवूड अभिनेत्याने या सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे. 

अभिनेता अरबाज खानने मुळशी पॅटर्न हा सिनेमा पाहिला असून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सिनेमाची कथा, सिनेमाचं दिग्दर्शन आणि सिनेमातील कलाकारांच कौतुक केलं आहे. या सिनेमातील सत्य गोष्ट जगासमोर आणली आहे असं मत अरबाजने व्यक्त केलं आहे. 

मुळशी पॅटर्न या सिनेमाचं सगळीकडूनच कौतुक होत आहे. 11 दिवसांमध्ये या सिनेमाने 11 करोड रुपयांची सुस्साट कमाई केली आहे. मुळशी पॅटर्न या सिनेमाने 3 दिवसांत 5 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता या सिनेमाने 11 दिवसांत 11 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाला शहरात आणि ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमाने ग्रामीण प्रेक्षकांबरोबरच शहरी प्रेक्षकांच देखील लक्ष वेधलं आहे.