Ankita Lokhande Mother In Law Reaction : 'पवित्र रिश्ता' या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडेला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी अंकिता बिग बॉस हिंदीच्या 17 व्या पर्वात झळकली. यानंतर अंकिता लोखंडे ही सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अंकिता ही वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. नुकतंच या चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अंकिताची सासू आणि विकी जैनची आई रंजना जैन यांच्या वक्तव्याने लक्ष वेधून घेतले आहे.
रणदीप हुड्डाचा बहुचर्चित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी गुरुवारी (21 मार्च) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिग बॉसमधील स्पर्धक, अभिषेक कुमार, आयशा खान, ईशा मालवीय, समर्थ जुरेल यांसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अंकिताची सासू रंजना जैनसह तिचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. यावेळी रंजना जैन यांनी सून अंकिताचे कौतुक केले.
सध्या रंजना जैन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अंकिताच्या सासूबाई या खळखळून हसताना दिसत आहेत. यावेळी एकाने त्यांना अंकिताचा चित्रपट कसा वाटला? असा प्रश्न विचारला. त्यावर रंजना जैन यांनी "अंकिता ही कायमच चांगली वाटते. पण चित्रपट कसा वाटला, हे मी चित्रपट पाहिल्यानंतर ठरवेन. यासाठी मला आधी चित्रपट तर पाहू दे. आमची अंकिता एकदम ए वन आहे", असे त्या म्हणाल्या.
यावेळी काही फोटोग्राफरने त्यांना तुम्हाला अंकितासारखी सून हवी होती ना? असे विचारले. त्यावर त्यांनी "हो, मग आता मिळाली ना", असे म्हटले. अंकिताच्या सासूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर अनेक नेटकरी कमेंट करतानाही दिसत आहेत.
दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डाने केली आहे. या चित्रपटात रणदीप हा वीर सावरकरांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे ही वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट आज 22 मार्च 2024 रोजी प्रदर्शित झाला.
LIVE|
NZ
205(75 ov)
|
VS |
WI
24/0(9 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 145/9
|
VS |
SIN
131/6(20 ov)
|
| Philippines beat Singapore by 14 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 75/9
|
VS |
MAS
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.