लक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्रींचा जलवा...

 कतरिना कैफची बहिण इसाबेल कैफने २०१४ मध्ये आलेल्या डॉ. केबी या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरूवात केली. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 2, 2018, 09:44 PM IST
लक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्रींचा जलवा... title=

मुंबई : कतरिना कैफची बहिण इसाबेल कैफने २०१४ मध्ये आलेल्या डॉ. केबी या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरूवात केली. लक्मे फॅशन वीकमध्ये ती अत्यंत सुंदर ब्लू ड्रेसमध्ये दिसली. इसाबेलला कॉस्मेटिक ब्रॅँड लक्मेचा नवा चेहरा बनवण्यात आले आहे. यासाठी तिला सलमान खानने शुभेच्छा दिल्या.

लग्नानंतर नेहमी आपल्या पतीसोबत दिसणारी अभिनेत्री सागरिका घाटगेने देखील लक्मे फॅशन वीकला हजेरी लावली. अभिनेत्री संगीत बिजलानी देखील सफेद अनारकली घालून फॅशन वीकमध्ये झळकली. तर अभिनेत्री यामी गौतम आपल्या बहीणीसह सुरीली गौतमसोबत आली होती. 

गुल पनाग खूप काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र लक्मे फॅशन वीकमध्ये तिने आर्वजून हजेरी लावली. अभिनेत्री सौंदर्या शर्मा देखील येथे दिसली. तिच्या हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती अगदी झकास दिसत होती. 

इंडियन फूटबॉल टीमचे कर्णधार बाइचुंग भूटीया देखील येथे डिझायनर करमा सोनम देखील येथे वॉक करताना दिसले.