कियारा आडवाणीचे बूट Apple फोनपेक्षा ही महाग, किंमत ऐकून व्हाल थक्क

कियाराने गुडघ्यापर्यंत असणारे बूट्स घातले होते.  

Updated: Jul 25, 2021, 10:25 PM IST
 कियारा आडवाणीचे बूट Apple फोनपेक्षा ही महाग, किंमत ऐकून व्हाल थक्क

मुंबई :  अभिनेत्री कियारा आडवाणी नेहमीच सोशल मीडियावर तिच्या हटके स्टाईलिंगमुळे चर्चेत असते. नुकतच तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी तिने अगदी कॅज्यूअल लूक केला होता. मात्र तिने घातलेले बूट हे यावेळी  सगळ्याचच लक्षवेधून घेणारे होते.

कियाराने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि त्यावर क्रॉप जॅकेट घातलं होतं. तर डेनिम जीन्सवर क्रॉकोडाईलच्या पॅटर्नची बॅग कॅरी केली होती. पण यावेळी तिने घातलेले बूट्स सर्वात जास्त चर्चेत होते.

कियाराचे लाखोंचे बूट

कियाराने गुडघ्यापर्यंत असणारे  बूट्स घातले होते. या बुटांना एलेनोर बोट्टा 100 असं बोललं जातं. डार्क ब्राऊन कलरच्या या बुटांची किंमत 1795 डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झालं तर तब्बल 1 लाख  33 हजार  597 रुपये इतकी कियाराच्या बुटांची किंमत आहे. 

कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddhartha Malhotra) लवकरत कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर आधारित 'शेरशाह' या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. 12  ऑगस्टला  हा सिनेमा  रिलीज होणार आहे.