Arjun Kapoor नं असं काय केलं की, मलायकावर डोक्यावर हात मारण्याची वेळ?

अर्जुनच्या प्रेयसीचं हे काय झालं?

Updated: Aug 18, 2022, 03:43 PM IST
Arjun Kapoor नं असं काय केलं की, मलायकावर डोक्यावर हात मारण्याची वेळ?  title=
Actress Malaika arora meme viral arjun kapoor trolled for commenting on Boycott Bollywood

Arjun Kapoor Malaika Arora : अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट किंवा मलायका अरोरासोबतच्या नात्यामुळं चर्चेत नाही, तर एका वेगळ्याच कारणामुळं त्यानं अनेकांचा रोष ओढावला आहे. हिंदी चित्रपटांवर सातत्यानं बंदीची मागणी होत असल्यामुळं त्यानं हल्लीच एका मुलाखतीत आपली बाजू मांडताना लक्षवेधी वक्तव्य केलं. 

शांत राहिलो तिथेच चुकलो, असं त्यानं कलाकार मित्रांनां संबोधत Boycott Bollywood ट्रेंडचा विरोध केला. आपल्या सहनशक्ती आणि सामंजस्याचा गैरफायदा घेतला गेल्याचं तो बंदीची मागणी करणाऱ्या प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला. (Actress Malaika arora meme viral arjun kapoor trolled for commenting on Boycott Bollywood)

प्रत्यक्षात (aamir khan, Akshay umar) आमिर खान आणि अक्षय कुमार (Laal Singh chaddha, Raksha bandhan) यांच्या चित्रपटांच्या निमित्तानं या वादाला तोंड फुटलं होतं. यामध्ये कुठेही अर्जुनच्या चित्रपटांचा विरोध केला गेला नव्हता. पण, तरीही त्याचं या विषयावर बोलणं अनेकांनाच खटकलं. 

वाचा : 'अर्जुन कपूर XX@ है...', नको तिथे तोंड खुपसणं अभिनेत्याच्या अंगाशी 

काहींनी तर, अर्जुननं कोणतीही समज नसताना हे वक्तव्य केल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं. इतक्यावरच न थांबता सोशल मीडियावर आता अर्जुनलाच कडाडून विरोध केला जात आहे. काहींनी तर, त्याच्या या वक्तव्याने प्रेयसी मलायकाला डोकं धरायची वेळ आली असेल असं म्हणत काही मीमही व्हायरल केले आहेत. अर्जुनच्या नावे सध्या असंख्य Meme व्हायरल होत आहेत. 

आता मुद्दा असा, की मलायका जाहीरपणे अर्जुनच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार का आणि दिल्यास ती नेमकी काय बोलणार?