एअरपोर्टवर रविना टंडनच्या मुलीला पाहताच पापाराझी म्हणाले, 'मिठाई कुठे आहे?' पण कारण काय

Raveena Tandon Daughter Viral Video: रविना टंडनच्या मुलीचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी तिला एअरपोर्टवर स्पॉट झाल्यावर पापाराझींनी नाना तऱ्हेचे प्रश्न विचारले होते. तेव्हा यावेळी तिनं काय उत्तर दिलं? पाहा

गायत्री हसबनीस | Updated: May 31, 2023, 07:58 PM IST
एअरपोर्टवर रविना टंडनच्या मुलीला पाहताच पापाराझी म्हणाले, 'मिठाई कुठे आहे?' पण कारण काय title=
May 31, 2023 | actress raveena tandon daughter rasha thadani spotted at mumbai airport (Photo: Viral Bhayani | Instagram)

Raveena Tandon Daughter Viral Video: मध्यंतरी रविना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी यांचा सोशल मीडियावर एकत्र फोटो (Raveena Tandon Daughter) व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांच्या फोटोकडे पाहून चाहते पुरते गोंधळून गेले होते. त्या दोघी त्या फोटोमध्ये इतक्या सारख्या दिसत होत्या की त्यांच्यातील रविना कोण आणि तिची मुलगी राशा कोण हेच कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे चाहते पुरते गोंधळून गेले होते. त्यांच्या या फोटोकडे अनेकांनी सकारात्मक कमेंट्स केल्या होत्या त्यामुळे त्यांच्या या फोटोंची बरीच चर्चा झाली होती. हे त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. काहींनी रविनाची मुलगी एवढी मोठी झाली अशीही कमेंट केली होती. 

या फोटोनंतर आता रविना टंडनची मुलगी राशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गोव्याला जाण्यासाठी रविनाची लेक एअरपोर्टवर नुकतीच स्पॉट झाली आहे त्यामुळे सध्या तिचीच चर्चा आहे. यावेळी तिनं लूझ थ्रीफॉर्थ पॅन्ट आणि टाईट स्लिवलेस ब्लाऊज घातला होता. तर तिनं केस मोकळे सोडले होते. तिच्या या फॅशन लुकचीही सर्वत्र चर्चा रंगली होती. यावेळी पापराझींनी तिला प्रश्न विचारून भांडावून सोडले. यावेळी तिला काही पापराझींनी विचारले की, ''मिठाई कुठे आहे?'' तेव्हा ती लाजत म्हणाली की, ''देईन, लवकरच देईन.''

हेही वाचा - Double XL चित्रपटातील अभिनेत्रीचा हटके अंदाज; समुद्रकिनाऱ्यावरील बिकीनीतले फोटो व्हायरल

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटलं असेल की नक्की अशी मागणी पापाराझींनी तिच्याकडे का केली. हो, यामागे एक खास कारण आहे. राशा ही काही दिवसांपुर्वी ग्रॅज्युएड झाली आहे. त्यानिमित्तानं पापाराझी हे तिच्याकडे मिठाई मागत होते. सध्या तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. असा प्रश्न विचारल्यावर तिनं ज्याप्रमाणे नम्रपणे सांगितले त्यावरून नेटकरी खुश झाले आहेत. तिच्या या नम्रतेवर इंप्रेस होऊन तिच्या या व्हायरल व्हिडीओखाली चांगल्या कमे्टंस करताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रविना तंडनही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती तिच्या आगळ्यावेगळ्या भुमिकेसाठीही ओळखली जाते. त्यामुळे तिच्या फोटोंवरही चाहत्यांच्या तूफान कमेंट्स येताना दिसतात. रविनाही इन्टाग्रामवर चांगलीच लोकप्रिय असते. तीही तिच्या चाहत्यांना आपले लेटेस्ट फोटो टाकत चाहत्यांना अपडेट करत असते. ती आपल्या मुलीसोबतही अनेक फोटोज शेअर करते सोबतच ती अनेकदा आपल्या लेकीसह स्पॉट होते. हल्ली बॉलिवूडमध्ये मायलेकीच्या जोड्या या गाजताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांची चर्चा रंगलेली दिसते.