तब्बल 800 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटातील 'ही' अभिनेत्री 'पुष्पा 2' मध्ये थिरकणार; महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्जुन कपूरच्या 'पुष्पा 2' या चित्रपटात श्रद्धा कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 22, 2024, 12:52 PM IST
तब्बल 800 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटातील 'ही' अभिनेत्री 'पुष्पा 2' मध्ये थिरकणार; महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन title=

Shraddha Kapoor Dance Number In Pushpa 2: गेल्या काही दिवसांपासून चाहते अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा तेलुगू चित्रपट आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट पुष्पा : द राइज़ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

'पुष्पा 2'  चित्रपटासंदर्भात एक मोठा बातमी सध्या समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर तिच्या 'स्त्री 2' चित्रपटामुळे जास्त चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 800 कोटींहून अधिक कमाई केली आहे. महाराष्ट्राशी खास नातं असणारी म्हणजेच मराठमोळ्या आईची ही लेक आता दाक्षिणात्य कलाजगत गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे असंय म्हणावं लागेल .

'पुष्पा 2' चित्रपटात दिसणार श्रद्धा कपूर 

श्रद्धा कपूर 'पुष्पा 2' चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामुळे चाहत्यांची देखील उत्सुकता आणखी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर तिच्या 'स्त्री 2' चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. आता ती अल्लू अर्जूनसोबत 'पुष्पा 2' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात श्रद्धाला एका स्पेशल डान्ससाठी घेतलं असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, यासंदर्भात निर्माते आणि अभिनेत्रींकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती मिळाली नाही. रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी डान्स नंबरसाठी अनेक कलाकारांचा विचार केला होता. यामध्ये अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या नावाचा देखील समावेश आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'पुष्पा 2' मध्ये श्रद्धा कपूरचा डान्स नंबर 

निर्मात्यांनी श्रद्धा कपूरची निवड केली आहे. श्रद्धा कपूर तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये प्रसिद्ध आहे. या गाण्यात श्रद्धा कपूर अल्लू अर्जुनसोबत डान्स करताना दिसणार असल्याचं म्हटलं आहे. 'पुष्पा' चित्रपटातील समंथा रुथ प्रभूच्या 'ऊ अंतवा' हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर निर्मात्यांना 'पुष्पा 2' चित्रपटासाठी एक खास गाणे करायचे आहे. त्यामुळे त्यांनी श्रद्धा कपूरची निवड केली आहे. अल्लू अर्जून आणि श्रद्धा कपूरच्या जोडीमुळे चित्रपटाची लोकप्रियता वाढेल. 

कधी रिलीज होणार 'पुष्पा 2' 

आतापर्यंत 'पुष्पा 2' चे निर्माता यांच्याकडून चित्रपटाच्या रिलीजबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 'पुष्पा 2' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटातील पहिले गाणे लॉन्च झाले आहे. चाहत्यांकडून देखील या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. सध्या अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो पुष्पराजची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील मूख्य भूमिकेत असणार आहे.