ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक

'ठंडे ठंडे पानी से नाहाना चाहिये...' 

Updated: Aug 10, 2019, 01:41 PM IST
ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक

मुंबई : ९०च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील सीटी केयर रुग्णालयात  त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या २ दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सध्या त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. पण अजूनही धोका कायम असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. विद्या सिन्हा यांना गेल्या अनेक वर्षांपासून हृदय आणि फुफ्फुसांसंबंधी आजार असल्याचं बोललं जात आहे. 

विद्या सिन्हा यांनी 'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'तुम्हारे लिए', 'पती, पत्नी और वो', 'सफेद झूट', 'मुक्ती' यांसारख्या चित्रपटांतून भूमिका साकारली आहे. 'ठंडे ठंडे पानी से नाहाना चाहिये' या संजीव कुमार यांच्यासोबतच्या गाण्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.