राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा ऐकून विकी कौशल म्हणाला, 'हा पुरस्कार...'

राष्ट्रीय पुरस्कारानंतर विकी कौशलची भावनिक पोस्ट

Updated: Aug 9, 2019, 09:14 PM IST
राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा ऐकून विकी कौशल म्हणाला, 'हा पुरस्कार...' title=

मुंबई : कोणत्याही कलाकाराला त्याच्या आयुष्यात, त्याने केलेल्या कामासाठी राष्ट्रीय सन्माम मिळणं हे सर्वात मोठं स्वप्नच असतं. या वर्षातील सुपरहिट चित्रपट 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' अभिनेता विकी कौशलची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर विकी कौशलने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विकीने त्याच्या ट्विटरवरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये अनेक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला असून अनेकांचे आभारही मानले आहेत. 

'माझ्या कामासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही, माझ्यासह संपूर्ण कुटुंबासाठी अतिशय गौरवाची गोष्ट आहे. या प्रसंगी, मी या पुरस्कारापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या प्रवासात मला मदत करणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानत असल्याचं' विकीने म्हटलंय.

'हा पुरस्कार मी माझ्या आई-वडिलांना, उरी चित्रपटाच्या सर्व सदस्यांना आणि आपल्या देशाच्या सैनिकांना समर्पित करत' असल्याचं म्हटलंय.

या पोस्टमधून त्याने अभिनेता आयुषमान खुरानाचंही सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.

'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'सारख्या सुपटहिट चित्रपटानंतर आता अभिनेता विकी कौशल 'सरदार उधम सिंह' या बायोपिकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शूजित सरकार यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये क्रांतीकारी उधम सिंह यांनी घेतलेल्या बदल्यावर चित्रपटाची कथा आधारित आहे.