आषाढीनिमित्त Adah Sharma नं गायलं विठूमाऊलीचं गाणं; VIDEO पाहून चाहते मंत्रमुग्ध

Adah Sharma Ashadhi Ekadashi Video : अदा शर्मानं आषाढी निमित्तानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अदाचा हा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे. त्यांनी कमेंट करत यावर खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 29, 2023, 03:28 PM IST
आषाढीनिमित्त Adah Sharma नं गायलं विठूमाऊलीचं गाणं; VIDEO पाहून चाहते मंत्रमुग्ध title=
(Photo Credit : Adah Sharma Instagram/Social Media)

Adah Sharma Ashadhi Ekadashi Video : आज आषाढी एकादशीनिमित्तानं पंढरपूरनगरी विठुमय झाली आहे. विठुरायाचे सावळे रुप डोळ्यात सामविण्यासाठी वारकरी लाखो संख्येने पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरनगरीत दाखल झाले आहेत. पंधरपुरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रत्येक व्यक्ती आज एकमेकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत. त्यात सगळ्यांचे आज व्हॉट्सअॅप स्टेटपासून सगळ्यांचे ते पर्सनलवर मेसेज करत शुभेच्छा देत आहेत. यात फक्त सर्वसाधारण लोकांनी नाही तर सेलिब्रिटींनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात एक म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा देखील आहे. अदा शर्मानं सोशल मीडियावर विठुरायाचं गाणं गात सगळ्यांना शुभेच्छा दिली आहे. 

अदा शर्मानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे गाणं शेअर केलं आहे. यात अदा शर्मा युकुलेलेवर गाणं गाताना दिसत आहे. यावेळी अदा शर्मा कोणतं गाणं म्हणतं आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर चला तर पाहू या...
तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालं ना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलं ना

ये गं, ये गं रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी
सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी

हा व्हिडीओ शेअर करत "आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा, विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा", असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अदाच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतकंच काय तर सगळ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, "मराठी भाषा खूप सुंदर बोलतेस. खूप अभिमान वाटतो तुझा." दुसरा नेटकरी म्हणाला, "पहिल्यांदा कोणत्या कलाकाराला एकादशीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे." तिसरा नेटकरी म्हणाला, "भारतीय संस्कृतीला खूप जपतेस. त्यामुळे तू मला खूप आवडतेस." आणखी एक नेटकरी म्हणाला, "अदा शर्मांला भाषेविषयी खूप अभिमान आहे. आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा."

हेही वाचा : Shoaib Ibrahim नं शेअर केला दीपिकाच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच म्हणाला...

आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या सणांपैकी एक आहे. असे म्हटले की एकादशीपासून भगवान विष्णू चार महिने निद्रेत जातात. त्यावेळी संपूर्ण पृथ्वीचा भार हा भगवान शंकरावर असतो. त्यामुळे पुढील चार महिने शंकर भगवान सृष्टीची काळजी घेतात. म्हणून आषाढी संपली की श्रावण महिना सुरु होते. यंदा अधिमास आल्यामुळे श्रावण दोन महिने आहे.