Rekha Fell In Love With Cricketer: अमिताभ यांच्यानंतर क्रिकेटपटूच्या प्रेमात पडलेल्या रेखा; पत्रिकाही जुळल्या पण...

Rekha Affairs: अमिताभ बच्चन यांच्याबरोबर रेखाच्या प्रेमप्रकरणाच्या अनेक कथा मनोरंजन सृष्टीमध्ये चर्चेत असतात. मात्र महानायकापासून वेगळं झाल्यानंतर या अभिनेत्रीच्या जीवनामध्ये एका क्रिकेटपटूची एन्ट्री झाली होती. अगदी या क्रिकेटपटूबरोबर लग्न करण्यासही रेखा तयार झाल्या होत्या. मात्र ते म्हणतात ना एखाद्याच्या नशिबात प्रेम नसेल तर काहीही केलं तरं ऐनवेळी सारं फिस्कटतं.

Updated: Jan 24, 2023, 07:53 PM IST
Rekha Fell In Love With Cricketer: अमिताभ यांच्यानंतर क्रिकेटपटूच्या प्रेमात पडलेल्या रेखा; पत्रिकाही जुळल्या पण... title=
Actress Rekha Love Life

Actress Rekha Love Life: रेखा या त्यांच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. रेखा यांच्या (Rekha) सौंदर्याच्या आजही चर्चा आहेत. आपल्या सौंदर्याबरोबरच दमदार अभिनय आणि अन्य एका गोष्टीसाठी रेखा कायमच चर्चेत राहिल्या. या शेवटच्या गोष्टीमुळे त्या आजही अनेकदा चर्चेत असतात. ही गोष्ट आहे त्यांची लव्ह लाइफ. जेव्ह जेव्हा रेखाबद्दलच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा झाल्या तेव्हा वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा यांच्या कथित प्रेमप्रकरणाच्या चर्चा तर आजही आठवणी म्हणून सांगितल्या जातात. मात्र तो काळच असा होता की रेखा यांच्या प्रेमात केवळ अव्वल अभिनेते नाही तर क्रिकेटपटूही पडले होते. या क्रिकेटपटूंमध्ये एक नाव फार खास होतं. ते नाव म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)

रेखा यांच्या आई होत्या फारच आनंदात

तुम्हाला वरील मजकूर वाचून धक्का बसला असेल पण हे खरं आहे. हे नाव ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. अमिताभ बच्चन यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर रेखा यांचा जीव इम्रान खान यांच्यावर जडला होता. विशेष म्हणजे इम्रानही रेखा यांच्या सौंदर्याने घायाळ झाले होते. या दोघांमधील जवळीक एवढी वाढली होती की वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या लग्नाच्या बातम्याही छापून आल्या होत्या. केवळ रेखाच नाही तर त्यांचे नातेवाईक आणि खास करुन त्यांच्या आईला इम्रान खान फारच आवडले होते.

पत्रिका जुळवल्या...

आपल्या मुलीचं इम्रानशी लग्न होणार आहे या विचारामुळेच रेखा यांच्या आई फारच आनंदात होत्या. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा यांच्या आई दोघांच्या पत्रिका जुळवण्यासाठी दिल्लीलाही गेल्या होत्या. या दोघांचं लग्न होणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात होतं. मात्र रेखा यांच्या नशिबाने त्यांना पुन्हा एकदा चकवा दिला आणि त्याचं लग्नाचं स्वप्न अधुरं राहिलं.

मात्र स्वप्न अपूर्ण राहिलं कारण...

एकीकडे रेखा या लग्नासाठी तयार होत्या. मात्र इम्रान या अभिनेत्रीला आपली पत्नी म्हणून स्वीकरण्यात तयार नव्हते. इम्रान यांना रेखा यांच्याशी लग्न करायचं नव्हतं. त्यावेळी इम्रान यांनीच एका मुलाखतीमध्ये स्वत: इम्रान खान यांनी अभिनेत्रींची सोबत एका ठराविक काळासाठी ठीक असते. मी ही सोबत एन्जॉय करतो आणि पुढे जातो, असंही इम्रान म्हणाले होते. या मुलाखतीनंतर रेखा आणि इम्रान यांचं नातं तुटण्याचं कारण इम्रान हेच होते हे स्पष्ट झालं.